औरंगाबादमध्ये स्क्वॅश खेळाच्या कोचला पळवून-पळवून चपलेने मारहाण! पहा Video
औरंगाबादमध्ये स्क्वॅश खेळाच्या कोचला पळवून-पळवून चपलेने मारहाण! पहा Video डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये स्क्वॅश खेळाच्या कोचला पळवून-पळवून चपलेने मारहाण! पहा Video

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : औरंगाबादच्या (Aurangabad) विभागीय क्रीडा संकुलात एका पालकाने स्क्वॅश खेळाच्या कोचला चपलेने मारहाण केल्याची घटना समोर आलीय. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात पालकाविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलाय. सूतगिरणी परिसरातील विभागीय क्रीडा (Sport) संकुलामध्ये स्क्वॅश खेळाची प्रॅक्टिस केली जाते. शुक्रवारी प्रशांत साठे हे पालक आपल्या मुलाला घेऊन खेळाच्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी एन्ट्री पासवरून प्रशांत साठे आणि कोचमध्ये शाब्दिक वाद झाला.

हे देखील पहा :

त्यावरूनच प्रशांत साठेने कोचला मागे लागून मारहाण केल्याचा आरोप कोचने केला आहे. एक पालक कोचला मागे लागून चप्पल फेकतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. याप्रकरणी क्रीडा विभागाकडून विभागीय क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराले यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या पालकांविरुद्ध तक्रार दिली आहे. विभागीय क्रिडा संकुलातील स्क्वॅशच्या खेळाडूंना धमक्या देणे, मारहाण करण्याचे प्रकार गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत सुरु असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.

त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रशांत साठे या नावाच्या व्यक्तीची दहशत पसरली आहे. विनाकारण धमक्या आणि मारहाण करत असल्यामुळे खेळाडूंनी १७ नोव्हेंबर रोजी उपसंचालकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर देखील साठेने २३ नोव्हेंबर रोजी चपलेने मारहाण केली. दरम्यान, यासंदर्भात आता थेट जिल्हाधिका-यांकडे तक्रार करणार असल्याचे क्रिडा उपसंचालक उर्मिला मोराळे यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

Maharashtra Election: नाशिक लोकसभा मतदारसंघात अवघ्या तासात २४ नवा ट्वीस्ट; समता परिषदेने घेतली नवी भूमिका

Benifits of Guar: अनेकांना नापसंत असणारी गवार आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Ratnagiri Sindhudurg : विनायक राऊतांनी नारायण राणेंचा भूतकाळ काढला; अनेक गोष्टी सांगून टाकल्या!

Pimpri Chinchwad News Today: पिंपरी-चिंचवडमध्ये मर्सिडीजमध्ये चक्क 29 लाखांची रोकड आढळून आल्यानं आश्चर्य!

SCROLL FOR NEXT