आसना नदीला आला पूर
आसना नदीला आला पूर 
महाराष्ट्र

अर्धापुरात अतिवृष्टीने सखल वस्तीमधील घरात शिरले पाणी, शेत गेले खरडून

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने पार दाणादाण उडाली असून शहरासह तालुक्यातील कामठा, मालेगाव,पार्डी आदी गावातील सखल वस्तीमधील घरात पाणी शिरले. तर काही गावतील शेती खरडून गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून गेल्या 24 तासात 122 मिलीं मिटर पावाची नोंद झाली आहे. या पावसाळ्यातील पहिलाच मोठा पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आले आहेत.

काही भागात पिकांचे नुकसान झाले आसले तरी पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणार आसल्यामुळे शेतक-यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर सखल भागातील वस्तीमधील घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - वसमत येथील अवघ्या १२ वर्षीय मुलाने चक्क एका कावळ्याच्या अनाथ पिल्याचे पालकत्व स्वीकारून स्वार्थापोटी अंध झालेल्या माणसांच्या डोळ्यात झनझनीत अंजन घातले आहे.

यंदाच्या खरिपाच्या पेरण्या जुन मध्येच आटोपल्याने शेतकरी समाधान होता. पण गेल्या पंधरवड्या पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातारण निर्माण झाले होते. या आठवड्यात पावसाने दरमदार हजेरी लावली. शहरासह तालुक्यात रविवारी (ता 11) दिवसभर पाऊस धोधो बरसल्याने पुरती दाणादाण उडाली.शहरातील दुर्गानगर, अंबाजीनगर, बसवेश्वर चौक, सखारामजी लंगडेनगर आदी भागाला तळल्याचे स्वरुप आले होते. तर बसवेश्वर चौक ते बायपास रस्त्यावर दोन फुटांच्यावर पाणी जमा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. शहरातील दुर्गानगर भागातील वस्ती मधील घरात पाणी शिरने हे नित्याचीच बाब झाली आहे. या भागातील पाणी नांदेड- हिंगोली रस्त्याच्या दोन्ही बाजुने मोठ्या नाल्या बांधून पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी आहे. या भागाला नगरसेवक अॅड. किशोर देशमुख यांनी भेट देवुन नागरिकांना दिलासा दिला व नगरपंचायतीच्या वतीने नालेसफाई करुन घेतली.

हा पाऊस सर्वदुर होता. कामठा, मालेगाव या गावातील वस्तीमध्ये पाणी शिरले. कामठा येथील बसवेश्वर शाळेकडे जाणारा रस्ता खरडून गेला. तसेच दाभड, शैलगाव, लहान, पार्डी आदी गावासह अतिवृष्टी झाली आहे. तालुका प्रशासन झालेल्या नुकासानिची माहिती घेत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT