जनावरे
जनावरे 
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो जनावरांना जपा, नव्या रोगाचे थैमान

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः तालुक्यातील पळवे परिसरातील अनेक जनावरांना लाळ्या खुरकूत व घटसर्पची लागण झाली आहे. काही जनावरे दगावलीही आहेत. त्यामुळे लसीकरण मोहीम तालुकाभर राबविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पळवे परिसरात मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय केला जातो. दुभत्या जनावरांबरोबरच इतरही जनावरांची संख्या मोठी आहे. लाळ्या खुरकूत होऊ नये म्हणून दर वर्षी जनावरांचे लसीकरण केले जाते. मात्र, या वर्षी त्याकडे दुर्लक्ष झाल्याने जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे दूधउत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. In Ahmednagar district, a new disease has killed animals

अनेक जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे तातडीने लसीकरण करणे गरजेचे आहे. आधीच शेतीमालाला व दुधालाही बाजारभाव नाही. त्यातच, या आजाराने जनावरे दगावत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

शासकीय पशुवैद्यकीय केंद्रात लस मिळत नसल्याने ती विकत घ्यावी लागत आहे. तीसुद्धा नगर येथून आणावी लागत आहे. लसीकरण वेळेत झाले असते, तर हे संकट टळले असते. In Ahmednagar district, a new disease has killed animals

- नानाभाऊ गाडीलकर, दूधउत्पादक शेतकरी

तालुक्यात लसीकरण व उपचार सुरू आहेत. लवकरच साथ आटोक्यात येईल. दगावलेल्या जनावरांच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल आला आहे. वरिष्ठांनीही भेटी दिल्या आहेत. सर्व शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.

- डॉ. दर्शना रेपाळे, पशुवैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : परभणीत हिंस्र प्राण्यांचा शेळ्यांवर हल्ला, शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

SCROLL FOR NEXT