संजय राठोड -
यवतमाळ : यवतमाळ Yavatmal मधील वणी तालुक्यातील निळापूर गावात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी या सरकारने सध्याची विशेष परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना विशेष मदत केली पाहिजे. ओला दुष्काळ Wet drought जाहीर करून भरघोस मदत द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच सत्तेचा अमर पट्टा घेऊन जन्माला आलेला सरकार Goverment नाहीये काही दिवसात आमचं सरकार निश्चित येणार कधी येणार आहे काहीही सांगता येणार नाही मात्र सरकार येणार असल्याच वक्तव्यं त्यांनी केलं आहे. (In a few days our government will definitely come - Devendra Fadnavis)
शासनाने आणेवारीचा खेळ बंद केला पाहिजे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली असून. सद्यस्थितीत पूरस्थिती व अतिवृष्टी Heavy Rain म्हणून आपत्ती घोषित करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. मात्र या सरकारच्या काळात पीकविमा Crop insurance व इतर मदतही शेतकऱ्यांना मिळत नाही असा आरोप देखील फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवरती केला आहे.
निळापुर Nilapur या गावात शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली कापूस, सोयाबीन Cotton soybeans सर्व गेलं आहे. अतिवृष्टी झाल्या मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेंगा उरलेला नाही आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मायबाप सरकारकडे नजर लावून सगळे शेतकरी बसले आहेत. मी राज्य सरकारला विनंती करतो ती तात्काळ आमच्या बळीराजाच्या पाठीशी उभे रहा आणि त्याला मदत करा असे आवाहनच त्यांनी यावेळी राज्य सरकारकडे केलं आहे.
सरकारच्या माध्यमातून काही ना काही मदत शेतकऱ्यांना या ठिकाणी काळात मिळायला पाहीजे मात्र आपलं दुर्दैव आहे की गेल्या दोन वर्षांत आलेल्या या सरकारने कुठल्याही आपत्तीमध्ये म्हणावी तशी मदत केलेली नाही केवळ घोषणा देतात मदतीच्या जीआर काढण्याच्या घोषणा होतात राज्य सरकारचे मंत्री टिव्ही Leaders On TV वर येऊन सांगतात पण पुढे काय झाल ते कधीच समजले नाही अशी टीका देखील फडणवीस यांनी केली.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.