Imtiyaz Jaleel saam tv
महाराष्ट्र

Imtiyaz Jaleel : औरंगजेबाची कबर हलवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Imtiyaz Jaleel News: छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात जलील आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान काही लोकांनी औरंगजेबाचा फोटो उंचावत घोषणाबाजी केली होती.

माधव सावरगावे, औरंगाबाद

Imtiyaz Jaleel Andolan : छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात एमआयएमने आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनावर टीका करताना शिवसेनेच्या नेत्यांनी औरंगजेबाचा इथे काही संबंध नाही, त्याची कबर इथून हलवायला हवी असे वक्तव्य केले होते. याविषयी प्रश्न विचारल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी, त्यांना काय करायचं ते करू द्या ते कोणाचं ऐकतात का? अशी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी शहराच्या नामांतराविरोधात आंदोलन सुरु केले आहे. एवढे दिवस आम्ही या शहराला एका नावाने ओळखत होतो आणि आता अचानक दुसरे नाव दिले आहे, असे म्हणत जलील यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान खासदार जलील यांच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनातील काही लोकांनी औरंगजेबाचा फोटो उंचावत जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे एमआयएमवर भाजप आणि शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. तसेच राज्यात विरोधकांकडून खासदार इम्तियाज जलील यांचा निषेध करत त्यांचे फोटो देखील जाळण्यात आले.

यानंतर इम्तियाज जलील यांनी या प्रकरणाची सारवासारव करत ज्यांनी फोटो दाखवला ते आमचे कार्यकर्ते नव्हते, आमच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी हे घडवून आणले गेले असा आरोप केला होता. त्यानंतर आता आता त्यांनी विरोधकांच्या औंरगजेबाची कबर हलवण्याच्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तर दिले आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या असे इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

दरम्यान इम्तियाज जलील यांनी आमचं उपोषण सुरूच राहणार असे म्हटले होते. त्यानंतर आंदोलनास्थळी बिर्यानी शिजत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या आरोपाला उत्तर देताना इम्तियाज जलील यांनी यु टर्न घेतला आहे. आमचं उपोषण नसून साखळी आंदोलन आहे, त्यामुळे तिथे रोजच जेवण होणार आहे. कदाचित माझं पहिल्या दिवशी मराठी चुकलं असेल म्हणून मी उपोषण म्हणालो असेल असे म्हणत जलील यांनी आपल्या विधानावर सारवासारव केली.

आमचे आंदोलन शांतता प्रिय मार्गाने आहे, ते तसेच राहील. सगळ्यांनी शांतीने आंदोलन करावं कायदा व सुव्यवस्थेची काळजी सगळ्यांनी घ्यावी असा आवाहन मी यावेळी करतो असेही जलील म्हणाले. तसेच जो कोणी शांतीने आंदोलन करेल त्या सगळ्यांना आमचा पाठिंबा असेल असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT