Khushbu Sundar: 'मी आठ वर्षाची होते अन्...' भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचे वडिलांवर गंभीर आरोप; सांगितला धक्कादायक अनुभव

माझा पती म्हणजे परमेश्वर आहे’ अशा मानसिकतेची माझी आई माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही याची मला भिती वाटायची, असेही त्या म्हणाल्या..
Bjp Leader khushbu Sundar
Bjp Leader khushbu SundarSaamtv

Delhi: अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) या दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहेत. महिलांच्या हक्कांबाबत ठाम मतं मांडणाऱ्या आणि आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या खुशबू यांनी अलीकडेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यत्वाचा पदभार स्वीकारला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बालपणातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला.

वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं होतं, असा खुलासा केला. त्यांच्या या खुलाश्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. बरखा दत्त यांच्या मोजो स्टोरीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये खुशबू सुंदर यांनी हा खळबळजनक खुलासा केला असून त्यावर आता खुशबू यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. (Latest Marathi News)

Bjp Leader khushbu Sundar
Manish Sisodia: मोठी बातमी! मनिष सिसोदियांना धक्का! न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

याबाबत अधिक माहिती अशी की, खुशबू सुंदर या भाजपा (BJP) नेत्या आहेत. २०१० मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला नुकतीच खुशबू सुंदर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या बालपणीचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

"मी आठ वर्षांची असल्यापासून वडिलांनी माझं लैंगिक शोषण करणं सुरू केलं होतं. आपल्या पत्नीला, मुलांना मारणं आणि मुलीचं लैंगिक शोषण करणं हा माझा अधिकारच आहे, असं माझ्या वडिलांना वाटायचं. जेव्हा एखाद्या लहान मुलगा किंवा मुलीवर अत्याचार होतो, तेव्हा ती घटना त्यांच्या मनावर आयुष्यभर परिणाम करते” असा खुलासा त्यांनी केला आहे.

Bjp Leader khushbu Sundar
Weird Love Story: अजब प्रेमाचा गजब किस्सा! सासऱ्याचा जीव जडला, सुनेला घेवूनचं पळाला; मुलगा म्हणतो....

याबद्दल पुढे बोलताना, जेव्हा मी १५ वर्षांची झाले, तेव्हा माझ्यामध्ये त्यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत आली. कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास सहन करावा लागू नये, म्हणून मी आठ वर्षं गप्प राहिले. ‘काहीही झालं तरी माझा पती म्हणजे परमेश्वर आहे’ अशा मानसिकतेची माझी आई माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही याची मला भिती वाटायची. पण जेव्हा मी १५ वर्षांची झाले, मी वडिलांविरोधात बोलायला सुरुवात केली, असेही त्या म्हणाल्या..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com