Imtiyaz Jaleel saam tv
महाराष्ट्र

Imtiyaz Jaleel : मी औरंगाबादचा खासदार आहे आणि राहणार! इम्तियाज जलील यांचं विरोधकांना थेट आव्हान

Imtiyaz Jaleel : दोन मिनिटात कशी टी-20 खेळली जाते, हे मी असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत राहून शिकलो आहे.

Chandrakant Jagtap

Imtiyaz Jaleel : मुंब्रा येथे एमआयएमचं राष्ट्रीय सम्मेलन पार पडलं. यावेळी बोलताना संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. दोन मिनिटात कशी टी-20 खेळली जाते, हे मी असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत राहून शिकलो आहे. त्यामुळे औरंगाबादचा खासदार मीच आहे आणि मीच राहणार असे म्हणत इम्तियाज जलील यांनी विरोधकांना थेट आव्हानच दिले. मी औरंगाबाद शहरातच जन्मलो आणि औरंगाबादमध्ये मरणार असेही ते म्हणाले.

औरंगाबादच्या नामांतरावरून देखील जलील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत आहे. देवेंद्र म्हणतात मी केले, एकनाथ शिंदे म्हणतात मी केले आणि ज्यांचे नाव आणि निशाणी सर्व गेले ते देखील म्हणतात की मी केले, असे म्हणत त्यांनी भाजप आणि शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर देखील टिका केली.

जलील म्हणाले, मी म्हणालो तुमच्याकडे ताकत आहे तर नाव बदला, त्यानंतर महाराष्ट्रात माझे पुतळे जाळले जात आहे. इम्तियाज जलील हाय हाय असे नारे लावले जात आहेत पण 2024 नंतर यांना बाय बाय म्हणावं लागणार आहे. (Latest Marathi News)

पठाणांना थाबवणं सोपं काम नाही. तुम्ही प्रयत्न करून पाहिला. चित्रपट पाहू नका असे सांगितले. पण पाहता पाहता तो पठाण हजार कोटी घेऊन गेला आणि आता तुम्ही या पठाणला अडवत आहात. तुमच्याकडे खूप पैसे असतील, पण पैसे वाटून तुम्ही वाघाच्या बछड्यांना विकत घेऊ शकत नाही, असे यावेळी बोलताना जलील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranveer- Deepika Daughter : कोणासारखी दिसते रणवीर- दीपिकाची लेक, Inside फोटोज् पाहा

Maharashtra Politics: महायुतीतील वाद चव्हाट्यावर; भाजप आमदाराची शिंदेंच्या आमदारावर शिवराळ भाषेत टीका|VIDEO

महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक, तिघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Best Bus Accident : बेस्ट बसला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, ब्रिजवर नेमकं काय घडलं?

दगडूशेठ गणपती मंदिरात महिला भाविकांना १० रुपयांची ओवाळणी भेट|VIDEO

SCROLL FOR NEXT