imtiaz jalil
imtiaz jalil  SaamTvNews
महाराष्ट्र

Imtiaz Jalil : ...तर MIM महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार, इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News : भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल आम्ही ताकदवान आहोत, तर त्यांनी आमच्याकडे यावे. खासदर असदुद्दीन ओवेसी यांचे नेतृत्व स्वीकारावे. तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ, असं वक्तव्य संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अहमदनगर येथे बोलताना केले आहे. (Latest Marathi News)

भाजपला हरवण्यासाठी देशातील जे जे लोक प्रयत्न करत आहेत त्या लोकांसाठी आम्ही आमच्याकडून जी पाहिजे ती कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

संभाजीनगर येथील दंगल नियोजित

संभाजीनगर येथील दंगल ही नियोजित होती असा स्पष्ट आरोप त्यांनी केला असून या दंगलीच्या पाठीमागे राज्यातील सत्ताधाऱ्यांसह इतर पक्ष सामील आहे. ज्या दिवशी ही दंगल घडली त्यादिवशी संभाजीनगरमधील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठे होते आणि काय करत होते? याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर सर्व काही सत्य समोर येईल.

आम्ही याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून आम्हाला फक्त दोन ओळीचे उत्तर मिळाले असून यावरूनच त्यांची मानसिकता समोर येते, असंही खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

कालीचरण महाराज भगव्या कपड्यातील गुंड

कालीचारण महाराजांसारखे भगव्या कपड्यातील गुंड असून त्यांची जागा जेलमध्ये आहे. आम्हाला बोलायची परवानगी द्या मग पाहू कोण जिंकतय. या लोकांना भगव्या कपड्याच्या आडून राज्यात देशात धार्मिक तेढ निर्माण करायची आहे, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

BSP National Coordinator : मायावतींनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉर्डिनेटरपदावरून हटवलं, आता जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT