Shinde Government  Saam tv
महाराष्ट्र

Cabinet Decision News: जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठी घोषणा; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

आरोग्य, अन्न आणि नागरी पुरवठा, जलसंपदा विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली आहे. आजच्या बैठकीत शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांव्यतिरिक्त आरोग्य, अन्न आणि नागरी पुरवठा, जलसंपदा विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय झाले यावर एक नजर टाकूया.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

>> राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार

>> धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे.यासाठी १ हजार कोटी निधीस मान्यता देण्यात आली आहे. ५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.  (Latest Marathi News)

>> डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार.

>> महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता दिली आहे. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत होणार.

>> पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता दिली आहे. यामुळे ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

>> पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण . छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख खर्चाचा विकास आराखडा. जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाखाचा विकास आराखडा.सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींचा विकास आराखडा.

>> राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT