IT Raid at BBC Office News : बीबीसी कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापेमारीवरून शिवसेना पक्षप्रमुख , माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'बीबीसी'च्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये बसतं, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लोबोल केला.
उरण, रायगड आणि कर्जत येथून अनेक सरपंच, सदस्य, भाजप (BJP), काँग्रेस येथील कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश केला. तसेच काँग्रेस कमिटीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रियाजशेठ बुबेरे यांनी देखील शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, अरविंद सावंत उपस्थित होते. प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'गेले ६ महिने मातोश्री सेनाभवन येथे पक्षप्रवेश यासाठी रीघ लागली आहे. देश वाचवण्यासाठी शिवसेनेसोबत येत आहेत'. तर बीबीसीच्या धाडीवरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. 'बीबीसीच्या कार्यालयावर धाड पडली आहे. हे कोणत्या लोकशाहीत बसतं? आवाज उठवला तर चिरडून टाकू. ही पाशवी वृत्ती थांबवावी लागेल, असा घणाघात ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला.
यावेळी सत्ताधाऱ्यांच्या हिंदुत्वावरील टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं. 'रियाजशेठ आमच्याकडे आले. आता म्हणतील हिंदुत्व सोडलं, टीका होईल. भारतमाता गुलाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते रोखायला एकत्र यायला हवं. मुस्लिम येतायत म्हणून हिंदुत्व सुटत असेल, तर मोहन भागवत मशिदीत गेले होते, तेव्हा काय सोडून आले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येतील, हे पाहावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.