Amravati:  इंपेरिया हॉटेलला भीषण आग; 1 मृत्यू
Amravati: इंपेरिया हॉटेलला भीषण आग; 1 मृत्यू  अरुण जोशी
महाराष्ट्र

Amravati: इंपेरिया हॉटेलला भीषण आग; 1 मृत्यू

अरुण जोशी

अमरावती : शहरातील राजापेठ परिसरात असलेल्या हॉटेल इंपेरियाला Imperia Hotel रात्री ३ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे Short circuit आग Fire लागली आहे. या आगीत एका व्यक्तीचा जीव गुदमरून मृत्यू झाला आहे. राजापेठ पोलिसांच्या Police सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आणि बाकी नागरिकांचे प्राण वाचले आहेत. राजापेठ परिसरात रात्री ३ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीने हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.

हे देखील पहा-

त्यामुळे दिलीप ठक्कर यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मिळलेल्या माहितीनुसार, दिलीप ठक्कर हे एका केबल टीव्ही कंपनी Cable TV Company मध्ये विदर्भ Vidarbha विभागाचे प्रमुख आहेत. त्याच कामाच्या संदर्भात ते अमरावती Amravati याठिकाणी आले होते. कामे आटोपल्यानंतर रात्री ते राजापेठ परिसरात असलेल्या हॉटेल इंपेरिया याठिकाणी आराम करण्यासाठी गेले होते.

रात्रीच्या ३ सुमारास हॉटेलला आग लागली आणि मोठ्या प्रमाणात धुर पसरला होता. या धुरामुळेच ठक्कर यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हॉटेल इंपेरियाच्या समोरच राजापेठ पोलीस ठाणे असून, रात्री पेट्रोलींगवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला आग लागल्याचे दिसले असता त्यांनी अग्निशामक विभागाला याची लगेच माहिती दिली. अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली.

या आगीत हॉटेलमध्ये मुक्कामी असेलेले इतर ५ व्यक्ती मात्र, सुदैवाने वाचले आहेत. मात्र, या आगीत ठक्कर यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ठक्कर यांच्या मृत्यूची बातमी समजताच शहरातील अनेक केबल ऑपरेटरनी धाव घेतली. सध्या त्यांच्या मृतदेह शवविच्छेदन करिता जिल्हा रुग्णालयात district hospital पाठविण्यात आला आहे. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचाही तपास राजापेठ पोलिस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

SCROLL FOR NEXT