Ganpati Bappa : चंद्रभागा नदी पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी!
Ganpati Bappa : चंद्रभागा नदी पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी! SaamTvNews
महाराष्ट्र

Ganpati Bappa : चंद्रभागा नदी पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी!

भारत नागणे

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पंढरपुरात साधेपणाने गणेश विसर्जन करण्यात आले. दरम्यान चंद्रभागा नदी पात्रात गणेश मूर्ती विसर्जन करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे नगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यात आले आहे.

हे देखील पहा :

दरवर्षी चंद्रभागा नदीपात्रामध्ये पंढरपूर शहरातील नागरिक गणेशाचे मूर्तीचे विसर्जन करतात. यावर्षी जिल्हा प्रशासनाने चंद्रभागेत गणपती मूर्ती विसर्जन करण्यास बंदी केली आहे. पोलिसांनी नदीपात्रा लगतच्या सर्व घाटांवर बेरी कटिंग करून गणेश भक्तांना नदीपात्रात जाण्यास बंदी केली आहे.

नगरपालिकेने पंढरपूर शहरातील विविध भागात 13 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन मंडप उभारले आहेत. या‌ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केले जात आहे. शहरातील नागरिकांनी ही नगरपालिकेच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला आहे. ढोल ताशांचा किंवा डॉल्बीच्या दणदणाटा शिवाय अतिशय शांततामय वातावरणामध्ये आज गणेश विसर्जन केले जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

Delhi News: दिल्लीत १५ टन बनावट मसाले जप्त; भेसळीत ॲसिड अन् लाकडी भुशाचा समावेश

Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यास काय करणार? कंगना रणौतने सांगितला पुढील प्लान

बुलढाणा : 'डीजे' बंदीनंतर मंगल कार्यालय, लाॅन्ससाठी पाेलिसांची नियमावली; जाणून घ्या सूचना

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मध्या नवा ट्विस्ट; मिहिका मिहीच्या नात्यामध्ये सावनीची सावली?

SCROLL FOR NEXT