खंडित केलेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करा : आ.मोनिका राजळे
खंडित केलेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करा : आ.मोनिका राजळे सचिन आगरवाल
महाराष्ट्र

खंडित केलेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करा : आ.मोनिका राजळे

सचिन आगरवाल

अहमदनगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी खंडीत केलेला ग्रामीण भागातील कृषी पंपाचा वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करावा या मागणीसाठी शेवगाव येथील गाडगेबाबा चौकातील महावितरण कार्यालयासमोर शेवगाव पाथर्डी रस्त्यावर आज सोमवार (ता.२९) भाजपच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याच मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही आजच महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

त्यामुळे आज भाजप व वंचितच्या वतीने समोरासमोर आंदोलन करण्यात आल्याने तालुक्यात चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. या आंदोलनामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर पाच किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अनेक वेळा आंदोलनकर्ते व प्रवाशांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. मात्र, वीज महावितरणचे अधिकारी व आमदार राजळे यांच्यामध्ये बील भरण्यासंदर्भात तोडगा निघू न शकल्याने आंदोलन साडेतीन तास सुरु राहीले.

हे देखील पहा :

दरम्यान, थकीत वीज बिल भरण्यासंदर्भात पाथर्डी रस्त्यावरील महावितरण कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्याचे उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. हे आंदोलनही चार तास सुरु होते. यावेळी अधिकारी व पक्षाच्या पदाधिका-यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

शेवगाव तालुक्यामध्ये शेतक-यांची रब्बी हंगामासाठी तयारी सुरु आहे. मात्र, महावितरणने थकीत बिलाच्या वसुलीसाठी तालुक्यातील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे विहीरी व कुपनलिकांमध्ये पाणी उपलब्ध असून देखील वीज पुरवठा खंडीत केल्याने पिकांना पाणी देता येत नाही. अशा अडचणीच्या परिस्थितीत शेतक-यांना महावितरणने सहकार्य करणे अपेक्षित असतांना सक्तीच्या वसुलीमुळे शेतक-यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

यासंदर्भात भाजपच्या वतीने खंडीत केलेला वीज पुरवठा त्वरीत सुरु करावा अशा आशयाची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली होती. मात्र, याबाबत कुठलाच निर्णय न घेतल्याने आमदार मोनिका राजळे यांनी आक्रमक होत आज महावितरण कार्यालयासमोर शेवगाव पाथर्डी रस्त्यावर साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी राजळे म्हणाल्या, अतिवृष्टी व पुराच्या संकटातून कसेबसे बाहेर पडलेल्या शेतक-यांना राज्य सरकार व महावितरणने एक प्रकारे कोंडीत पकडले आहे. शेतक-यांच्या पिकांचा व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. पिकांना पाण्याची गरज असतांना महावितरणने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचे दडपशाहीचे धोरण सुरु आहे. थकीत वीज बील भरण्यासाठी दोन टप्पे पाडून ही रक्कम भरण्यासाठी मदत दयायला पाहीजे होती. मात्र, अधिकारी कोणाच्या तरी दबावाला बळी पडत आहेत.

यावेळी आमदार राजळे व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल लोहारे यांच्यामध्ये बीलासंदर्भात तोडगा निघालाच नाही. त्यामुळे पोलीस उपअधिक्षक मुंढे यांच्या आदेशाने पोलीसांनी आमदार राजळे व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस वाहनामध्ये बसवून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले.

या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापुसाहेब पाटेकर, बापुसाहेब भोसले, महेश फलके, संभाजी जायभाये, कचरु चोथे, गणेश कराड, भिमराज सागडे, तुषार पुरनाळे, वाय.डी.कोल्हे, आशा गरड, रवी सुरवसे, राहुल बंब, संदीप खरड, नितीन दहिवाळकर, कासम शेख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सरळीत करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT