IMD Rain Alert  Saam Digital
महाराष्ट्र

IMD Rain Alert : मराठवाड्यावर पुन्हा गारपीट, अवकाळीचं सावट; पुढचे तीन दिवस हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

Rain Alert In Marathwada : मराठवाड्यावर पुन्हा गारपीट, अवकाळीचं सावट असून पुढचे तीन दिवस हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेले काही दिवस राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता.

Sandeep Gawade

गेले काही दिवस राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. ऐन उन्हाळ्यात नदीनाले तुडुंब भरून वाहात होते. कायम दुष्काळी बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा पुढचे तीन दिवस मराठवाड्यावर गारपीट आणि अवकाळी पावसाचं सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रासह देशात सध्या उष्णतेची लाट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट, वादळाच्या ही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. येत्या ३ दिवसात मराठवाड्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज, हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमान ४३ अंशांपर्यंच पोहोचलं आहे. उत्तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं, असा सल्ला देण्यात आलाय.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे उकाड्यामुळे नागरिकांचे हाल झाले. तसंच, शेतपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. आता पुन्हा हवामान विभागाने इशारा दिल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोरिवली लक्ष्मी अपार्टमेंट कार्टर रोड नंबर तीन इमारत पडली

IPL च्या इतिहासातील महागडा परदेशी खेळाडू, २५.२० कोटींची बोलीही लागली, तरीही ग्रीनला का मिळणार फक्त १८ कोटी?

Pappyachya Pinkichi Love Story: गुन्हा आणि प्रेमाची दमदार कहाणी; 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'चे पहिले पोस्टर प्रदर्शित

Secret Santa Gifts : 'सीक्रेट सांता'मध्ये काय गिफ्ट द्या? वाचा '10' युनिक गिफ्ट आयडिया, मैत्रिणी होतील खुश

पुणेकरांचा काही नेम नाही! पाईपलाईन फुटली कार धुतली|VIDEO

SCROLL FOR NEXT