Shahapur Fire: शहापूरमध्ये प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग, सर्वत्र पसरले धुराचे लोट

Shahapur Plastic Company Fire: आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. या आगीमुळे आसपासच्या परिसरमध्ये धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Shahapur Fire
Shahapur FireSaam TV

फैय्याज शेख, शहापूर

शहापूरमध्ये (Shahapur) भीषण आगीची घटना घडली आहे. प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग लागली. शाहपूर तालुक्यातील लाहे येथे ही घटना घडली. आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. या आगीमुळे आसपासच्या परिसरमध्ये धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील लाहे येथे असलेल्या ऐश्वर्या प्रो.लिमिटेड कंपनीमध्ये भीषण आग लागली. साडेपाचच्या सुमारास या कंपनीला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यामुळे शेजारी असलेल्या पीसीपीइ कंपनीला देखील आग लागली. या कंपनीमध्ये फायबरच्या टाक्या बनवल्या जातात. आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली.

Shahapur Fire
Exclusive: चंद्रपूरमध्ये मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का मारल्याचा दावा

आगीची माहिती मिळताच भिवंडी महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ऐश्वर्या प्रो. लिमिटेड कंपनीमध्ये प्लास्टिकचे दाने तयार केले जात होते. प्लास्टिक असल्यामुळे आग वाढतच चालली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशम दलाच्या जवानांना अडचणी येत आहेत. भिवंडी लांब असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचण्यास उशिर झाला. अशामध्ये आग वाढतच गेली. या आगीमध्ये कंपनी जळून खाक झाली.

Shahapur Fire
Nagpur Loksabha Election 2024: जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने बजावला मतदानाचा हक्क

ऐश्वर्या कंपनीमध्ये २५० पेक्षा जास्त कामगार काम करत होते. ही कंपनी दिवस रात्र चालू असते. आज शुक्रवार असल्यामुळे कामगारांना सुट्टी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या कंपनीमध्ये स्थानिक कामगारांची संख्या जास्त आहे. या कंपनीला आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशामध्ये आता २०० पेक्षा अधिक स्थानिक कामगार चिंतेत आले आहेत.

Shahapur Fire
IMD Rain Alert : मराठवाड्यावर पुन्हा गारपीट, अवकाळीचं सावट; पुढचे तीन दिवस हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com