IMD Rain Alert Saam Digital
महाराष्ट्र

IMD Rain Alert : पालघर, रायगड, ठाण्यात मुसळधार पावसासह ५५ किमी वेगाने वाहणार वारे; समुद्राला भरती, ३.२४ मीटर उंचीच्या उसळणार लाटा

IMD Rain Alert In Mumbai : पुढील ३ तासांत पालघर, रायगड आणि ठाण्यातील काही ठिकाणी ४५-५५ किमी वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचाच्या सरी कोसळणार आहेत. ४:२७ मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून ३.२४ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

Sandeep Gawade

मुंबई आणि नवीमुंबई परिसरात पुन्हा पावसाने जोर धरला असून सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रायगडसह कोकणातही जोरदार पाऊस आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील ३ तासांत पालघर, रायगड आणि ठाण्यातील काही ठिकाणी ४५-५५ किमी वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसंच ४:२७ मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून ३.२४ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज दिवसभर रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा हावामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई, उपनगरं, कल्याण-डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ बदलापूरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. याशिवाय अनेक रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर वाहतूक कोंडी देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दहिसर पूर्वेकडील एसवी रोड आणि शिवाजी रोड परिसरात तब्बल दोन फुटापर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालकांना मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिक्षाच्या इंजिनला पाणी लागत असल्यामुळे अनेक रिक्षा देखील बंद पडल्या आहेत. पालघरमध्ये पावसाने दमदार हजेरी . जिल्ह्यातील अनेक भागात मागील तासाभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जिल्ह्यातील नद्यांनाही मोठा पूर आला आहे. त्यामुळे भात रोपणीची कामं रखडली आहेत.

मुसळधार पावसाने अलिबाग ते खानाव मार्गावर पाणी साचले आहे. रस्त्यावरून दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्यामुळे येथील वहातुक प्रभावित झाली असून या पाण्यातून मार्ग काढताना मिनिडोअर उलटली आहे. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. स्थानिक ग्रामस्थांनी अपघातग्रस्त मिनिडोअर पाण्यातून बाहेर काढली. डहाणूतील गंजाड - धानिवरी रस्ता पाण्याखाली गेल्याने गावांचा बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. गंजाड धानिवरी रस्त्यावरील सुसरी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आवढानी , धानीवरी , ओसरविरा गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT