Maharashtra Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Monsoon Rain Alert : राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सुरु होणार, आज या जिल्ह्यांना झोडपणार; वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा परतीचा पाऊस सुरु होणार असून आज आज महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

Satish Daud

मान्सूनने पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला असून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज सोमवारी (ता. ७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात बाप्पयुक्त वारे तयारी झाले आहेत. हळुहळू या वाऱ्यांची घुसळण होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शक्यतो सायंकाळी किंवा रात्री पडण्याचा अंदाज आहे.

दुसरीकडे राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३५ अंशाच्या पार गेला आहे. रविवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा येथे तापमानाचा पारा ३५ अंशाचा पार आहे. अचानक तापमानात वाढ झाल्याने प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे.

अशातच उकाड्यातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण, आज (ता. ७) मुंबई ठाण्यासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अल निनोचा प्रभाव संपल्यानंतर भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार, सप्टेंबर महिन्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र, त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT