Weather Forecast 15 October 2024 IMD Rainfall Alert in Mumbai Thane Pune Nashik Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट; कोणकोणत्या भागात कोसळणार पाऊस? वाचा...

Weather Update Tuesday 15 October 2024 : भारतीय हवामान खात्याने आज बुधवारी राज्यातील १५ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला असून अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Satish Daud

Rain News Today Maharashtra : सध्या मौसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरु असून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी मुंबईसह उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. दुसरीकडे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दरम्यान, आजही राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवार (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता आहे. मुंबईसह पुण्यातही जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमानात आणखीच घट होणार आहे.

तसं पाहता सध्या परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. मात्र, पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. सोमवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर अकोला येथे ३६.१ अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे. तर परभणी आणि अमरावतीमध्ये तापमान ३५ अंशाच्या पार गेलं आहे.

पुढील दोन दिवस राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे. कारण, हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट दिला आहे. तर नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मराठवाड्यात देखील आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील, असं आयएमडीने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी. तसेच काढणीला आलेली पिके झाकून ठेवावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT