Maharashtra weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची उघडीप, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ कायम असून ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ चा ताप कायम आहे

  • हवामान खात्याने काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे

  • हवामान विभागाने कोकण, मराठवाडा, विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला

  • दिवसभर उकाडा तर पहाटे गारवा जाणवत असल्याने हवामानात मोठा बदल

महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हीट’ कायम आहे. ढगाळ हवामानामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. आज राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाच्या उघडिपीसह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महाराष्ट्रात काही प्रमाणात उन्हाची तीव्रता आणि उकाडा कायम असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांना तापदायक ठरत आहे. तसेच किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटेच्या सुमारास गारवा वाढू लागला आहे. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ३५.८ अंश सेल्सिअस, ‎डहाणू, ‎ब्रह्मपुरी येथे ३५ अंशांपेक्षा अधिक, तर सोलापूर, ‎रत्नागिरी, अमरावती, ‎‎अकोला, जळगाव, ‎चंद्रपूर येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २१) सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह, मुख्यतः कोरडे हवामान, आणि उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान पावसाच्या उगडीपीमुळे आणि उकडाच्या काहिलीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्यासारखे आजार जोर धरू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

SCROLL FOR NEXT