Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : दिवाळी संपली तरी पाऊस जाईना, पुढचे २ दिवस महत्वाचे; मुंबईसह २६ जिल्ह्यांना झोडपून काढणार

Maharashtra Weather Update : हवामान खात्याने महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

राज्यातील २६ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा यलो अलर्ट

पुढील काही दिवस पावसाची शक्यता

हवामान विभागाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

ऑक्टोबर हिटनंतर पावसाच्या उघडीपमुळे काहीसा दिलासा

राज्यातुन मान्सून माघारी गेला असून पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. आज मुंबईसह २६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आज मुंबई शहर,मुंबई उपनगर , ठाणे,रायगड, पालघर,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक , अहिल्यानगर , पुणे,सातारा,सांगली, कोल्हापूर,सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड,परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान या जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत.

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिट मुळे दुपारच्या वेळेस बाहेर पडणं नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे. मात्र पावसाच्या उघडीपमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटे गारवा वाढू लागला आहे. तर काल कोकणासह, मुंबईत पावसाने हजेरी लावली.

दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस महत्त्वाचे असून पावसाची उघडीप सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाच्या ऐन दिवाळीत पाऊस पडल्याने नागरिकांच्या आनंदावर विरझन पडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता पक्षासारखं हवेत उडा? पंख लावून माणसाला हवेत उडता येणार?

Maharashtra Politics: अखेर दोन्ही शिवसेना एकत्र! बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी चमत्कार

Brushing Teeth At Night: रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याचे फायदे काय ?

Shilpa Shetty Photos: बोल्ड अन् ब्युटिफूल शिल्पा शेट्टीचा नवा लूक, ब्लॅक आऊटफिटमध्ये घातलाय धुमाकूळ

कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या युतीची खिचडी शिजली; कट्टर विरोधक आले एकत्र, कागलचं राजकारण 24 तासात फिरलं

SCROLL FOR NEXT