Ratnagiri News Saam Tv
महाराष्ट्र

Kokan Rain Alert : कोकणात पावसाची दमदार बॅटिंग, हवामान खात्याचा यलो अलर्ट; पुढील दोन दिवस वातावरण कसं राहील?

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी करत पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Alisha Khedekar

  • कोकणात पुन्हा पावसाची दमदार सुरुवात

  • कोकणाला हवामान खात्याचा यलो अलर्ट जारी.

  • रत्नागिरी, देवरुख, लांजा भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी

  • बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाचा अंदाज पुढील दोन दिवस कायम

राज्यातुन मान्सून माघारी जात आहे. अशातच कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार आज कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला होता. तर काही ठिकाणी उन्हाची काहिली भलतीचं ताप देत आहे. त्यातच रत्नागिरीसह कोकणात पावसाची बॅटिंग सुरु झाली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे त्यामुळे पुढील दोन दिवस कोकणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी - जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख, संगमेश्वर, लांजा, राजापूर भागात दमदार पाऊस सुरु झाला आहे.

हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार, आज रत्नागिरी, सिंधूदुर्ग मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभाणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात मात्र कोरडे हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

उद्या म्हणजेच गुरुवारी कोकणातील सिंधूदुर्ग, रायगड, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT