Maharashtra Weather Saam Tv
महाराष्ट्र

Cyclone Alert : ‘मोंथा’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोसळधार?

Maharashtra Weather : ‘मोंथा’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रासह विदर्भ, कोकण आणि मुंबई परिसरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Alisha Khedekar

मोंथा’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील काकीनाडा किनाऱ्यावर धडकणार

महाराष्ट्रात विदर्भ, कोकण आणि मुंबईत पावसाचा यलो अलर्ट

पुढील काही दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

अरबी समुद्रातील दबाव क्षेत्रामुळे गुजरात आणि राजस्थानमध्येही पावसाची शक्यता

राज्यात 'ऑक्टोबर हिट'चा ताप वाढलेला असताना आता चक्रीवादळाचं संकट आलं आहे. मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात आणि उद्या पावसाची शक्यता आहे.मोंथा चक्रीवादळाचे रुपांतर काल सकाळी अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. ही चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशातील काकीनाड भागात किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, छत्तीसड आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

२७ ऑक्टोबरला आंध्र किनारपट्टीपासून १७० कि.मी. वर असलेले ‘मोंथा’ चक्रीवादळ २८/२९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री काकीनाडा (आंध्र प्रदेश) किनारपट्टीला ८०–८५ कि.मी. प्रतितास वेगाने धडकणार आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ ३० ऑक्टोबरला महाराष्ट्रातील नागपूर परिसरावरून पुढे जाऊन ३१ ऑक्टोबरला बिहार–पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात प्रवेश करेल.

या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि शेजारच्या भागात सोमवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. तेलंगणाच्या काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भात उद्या पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या किनारी आणि उत्तर भागात, तमिळनाडू आणि केरळमध्येही काही ठिकाणी दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्याने मोंथा चक्रीवादळामुळे राज्यातील मुंबई, मुंबईउपनगर, विदर्भ, कोकणात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील काही दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मुसळधार पाऊस पडणार आहे . दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ‘मोंथा’च्या प्रभावामुळे २७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र–गुजरात किनाऱ्याच्या आसपास स्थिरावलेला राहणार असून ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान गुजरातमार्गे राजस्थानकडे सरकण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पॅराग्लायडिंग करताना अपघात; पायलट १३,५०० फूट उंचीवरून कोसळला

जलसंधारण आणि वृक्ष संवर्धनासाठी बदलापूरच्या तरुणांचा पुढाकार, जांभूळ ट्रस्टच्या माध्यमातून 2.5 कोटी लिटर पाण्याची साठवण

Thane To Amravati: विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवीच्या दर्शनाला जायचंय? ठाण्याहून अमरावतीला कसे जाल, जाणून घ्या सर्वोत्तम पर्याय

Doctor Case : मृत महिला डॉक्टरचा हॉटेलमधील पहिला CCTV व्हिडिओ समोर, रूममध्ये संपवलं होतं आयुष्य

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये भटके विमुक्त, बलुतेदार ओबीसी समाजाचा एल्गार महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

SCROLL FOR NEXT