Maharashtra Weather News Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढील ३ दिवस महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पडणार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather News : महाराष्ट्रासाठी पुढील ३ दिवस महत्त्वाचे! २० ते २२ एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन.

Alisha Khedekar

  • राज्यात तापमान ४० अंशांपार

  • २०-२२ एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता

  • अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस

  • शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअस पार गेला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच आता पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान मेघगर्जनेसह, वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यतः या काळात शेत पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज कोकण, विदर्भ, मराठ वाड्यात तापमान ४० अंश पार गेले असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीत दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.

२० आणि २१ एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत असून, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. मात्र २२ तारखेला वादळी पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत घट होईल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन

  • शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत

  • काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत

  • वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी

  • शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये.

यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेचा अलर्ट

हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा यवतमाळ जिल्ह्याला दिला आहे. मागील काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत आहे. जिल्ह्याचा पारा ४३ अंशावर पोहोचला असून रात्रीचे तापमान हे ३० अंशावर आले आहे, त्यामुळे दिवसाप्रमाणे रात्रीही उकाडा कायम आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये उष्णता अधिक जाणवत आहे. पुढील काही आठवडे तापमान वाढणार असल्याने खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT