maharashtra weather update Saam TV
महाराष्ट्र

Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Rain News: एकीकडे उष्णतेचा पारा चढत असताना दुसरीकडे हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

Satish Daud

IMD Rain Alert in Maharashtra

एकीकडे उष्णतेचा पारा चढत असताना दुसरीकडे हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या तुफान पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने अवकाळी पावसाच्या (Heavy Rain) सरी कोसळत आहेत. हवामान बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

दरम्यान, हवामान खात्याने येत्या ४८ तासांत राज्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे.

चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आला आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, ठाणे आणि मुंबईमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोल्हापूरमध्ये देखील पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. दोन आठवड्यापूर्वी सुद्धा विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे शेतीसह फळबागांचं मोठं नुकसान झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT