Maharashtra Rainfall x
महाराष्ट्र

Maharashtra Rainfall : मान्सूनचा राज्यातून निरोप, पण वादळी पावसाचा इशारा; पुढचे ४ दिवस धो-धो कोसळणार

Rainfall Alert In Maharashtra : राज्यात मागच्या काही दिवसांपासून हवामानात कोरडेपणा आहे. नैऋत्य मान्सून राज्यातून निरोत घेत असताना हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Yash Shirke

  • नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला असताना हवामानामध्ये बदल होणे अपेक्षित आहे.

  • १५ ऑक्टोबरपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

  • विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Heavy Rainfall : मागील काही दिवसांपासून राज्यामधील वातावरणामध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळ्यानंतर आता राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे. महाराष्ट्रामधून नैऋत्य मान्सूनने निरोप घेतला आहे. महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यामधील वातावरण कोरडे आहे. १५ ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल होणे अपेक्षित आहे. १५ ऑक्टोबरपासून किमान १८ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे.

सध्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. यादरम्यान तेथील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. या तुलनेमध्ये खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.

१५ ऑक्टोबरपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा परिणाम शेतीवर होत असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

Maharashtra Politics: आघाडीची थाटात घोषणा पण आठ दिवसातच काडीमोड; वंचित-काँग्रेसचं काही जमेना

8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स आणि डिजाइनही जबराट; बाजारात हटके मोबाईल लाँच होणार?

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

SCROLL FOR NEXT