Maharashtra Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain News: महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; IMDचा अंदाज

Maharashtra Rain Alert: येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Satish Daud

IMD Rain Alert in Maharashtra

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. परिणामी काही भागातून थंडी गायब झाली असून तापमानात वाढ झाली आहे. अशातच येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ७२ तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता (Maharashtra Rain News) आहे. कोकणासह रायगड जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे.

दुसरीकडे धुळे, नंदुरबार येथेही रविवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस (Heavy Rain Alert In Maharashtra) पडू शकेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.

यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल

राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली, तरी मुंबई, पुणे आणि ठाण्यात पावसाचा अंदाज नाही. मात्र, दाट धुक्याच्या प्रभावामुळे मुंबईत गुलाबी थंडी पडण्याची शक्यता आहे. ठाणेकरांना देखील थंडीचा कडाका जाणवू शकतो पुणे शहरासह जिल्ह्यातही कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकला, पाहुण्याचा तडफडून मृत्यू

Viral Video: केस ओढले, लाथा बुक्क्यांनी मारहाण अन्....; विद्यापीठात विद्यार्थिनींचा राडा

Amruta Khanvilkar : नऊवारी पैठणी, हातात हिरवा चुडा अन्...; नव्या नवरीसारखी नटली अमृता खानविलकर, फोटोवरून नजर हटणार नाही

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT