मुंबई : एकीकडे उत्तर भारत आणि मध्य भारतात थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांत पाऊस पडत आहेत. ऐन हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, येत्या ४८ तासांत महाराष्ट्रातील काही भागांत मेहगर्जनेसह मुसळधार पाऊस (Weather Updates) पडेल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळामुळे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट ओढवलं आहे. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.
त्यामुळे आज म्हणजेच मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Maharashtra Weather) हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान खात्यानुसार, आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश ते तेलंगणा आणि कर्नाटकपर्यंत पाऊस पडू शकतो.
त्याचवेळी, येत्या काही दिवसांत उत्तरप्रदेश-बिहार, झारखंड, दिल्ली, उत्तराखंडमध्ये थंडीचा कडाका वाढल्याचा पाहायला मिळू शकतो. IMD नुसार, पुढील २४ तासांत दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील एकाकी ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू राहण्याची आणि त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे.
१३ डिसेंबरच्या सुमारास आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. आज तामिळनाडू, दक्षिण आतील कर्नाटक, दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेश, केरळ, माहे, रायलसीमा येथे काही ठिकाणी मुसळधार पावसासह बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.