राज्यात गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री! SaamTv
महाराष्ट्र

राज्यात गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री!

राज्यात गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री होत असल्याची धक्कादायक बाब अन्न व प्रशासनाच्या (FDA) कारवाईत समोर आली आहे.

सूरज सावंत

मुंबई : राज्यात गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री होत असल्याची धक्कादायक बाब अन्न व प्रशासनाच्या (FDA) कारवाईत समोर आली आहे. राज्यातील 384 ठिकाणांची तपासणी केली असता. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधे चढ्या दराने विकली जात असून विक्रेत्यांकडून सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे कारवाई दरम्यान समोर आले आहे.

या प्रकरणी आतापर्यंत राज्यभरात 14 गुन्हे नोंदवण्यात आले असून 11 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. तर 42 जणांना आतापर्यंत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गर्भपाताची औषधे स्ञीरोग तद्य डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय किरकोळ विक्रेत्यांना विकता येत नाहीत.

औषधांची विक्री करताना रुग्णालयाची व डॉक्टरांची सर्व माहिती नोंदवणे आणि ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. असे असताना देखील सर्व नियमांचे उल्लंघन करून राज्यात या औषधांची विक्री केली जात आहे. FDA च्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद मंडळात 26 जून ते 9 जुलै या विशेष मोहिमेंतर्गत 384 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती डी.आर. गहाणे सहआयुक्त मुख्यालय, FDA यांनी दिली.

या कारवाई दरम्यान 14 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात 13 किरकोळ औषध विक्रेते आहेत. डॉक्टरांची चौकशी केली असता त्यांना या औषधांचा वापर कुठे आणि कसा झाला याची माहिती देता आली नाही. त्यामुळे या डॉक्टरांविरोधात देखील गुन्हे दाखल करण्यात आले. तर 42 औषध विक्रेत्यांकडून काही नियम मोडले जात असल्याचेही निदर्शनास आले. या विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी FDA अधिक तपास करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT