हिवरखेड आरोग्य केंद्रात अवैध गर्भपाताचा गंभीर आरोप
आमदार मिटकरींच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालेली भीषण आरोग्य व्यवस्था
आरोग्य सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त
दोषींवर कठोर कारवाई व चौकशीची मागणी वाढली
अक्षय गवळी, अकोला
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे . केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेत या आरोग्य केंद्राचा समावेश आहे. या आरोग्य केंद्राला सरकारने आयुष्यमान आरोग्य मंदिरा'चा दर्जा दिला आहे. मात्र, याच आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा संशय खुद्द सरकारमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.
या आरोग्य केंद्राचं 'स्टिंग ऑपरेशन'च आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. आमदार मिटकरींनी केलेल्या पाहणी आणि 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये त्यांना रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मासाचे गोळे आढळलेत. त्यामूळे या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.
दरम्यान, हिवरखेड हे ४० हजार लोकसंख्येचं गाव आहे. येथील आरोग्य केंद्राशी सातपुड्याच्या पायथ्याशी असेलली जवळपास ३५ आदिवासी खेडी आणि इतर गावं जोडलेली आहेत. मात्र, इतक्या महत्वाच्या असलेल्या आरोग्य केंद्रात कोणत्याही आरोग्य सुविधा नाहीये. येथील कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. रूग्णालयातील यंत्रसामग्री बंद अवस्थेत धुळखात पडल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आली आहे.
यासोबतच रूग्णालयात घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरलं आहे. दरम्यान, या आरोग्य केंद्रात गर्भपाताच्या शक्यतेची सरकार आणि प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशीची मागणी आमदार मिटकरी यांनी केली आहे. यासोबतच यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी आमदार मिटकरी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. आमदार मिटकरींच्या आरोपांवर सरकार आणि प्रशासन काय कारवाई करतेय?, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.