Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Expressway : अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी सुरू होणार समृद्धी महामार्ग, फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे शेवटचा टप्पा ५ जूनला सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. आता मुंबई ते नागपूर प्रवास फक्त ८ तासांत शक्य. महाराष्ट्राच्या विकासाला गती.

Namdeo Kumbhar

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway Final Phase Opens June 5 : मुंबई आणि नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्गाचा (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग) शेवटचा टप्पा सुरू करण्याचा अखेर मुहूर्त ठरला आहे. गुरूवार, ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी भिवंडी तालुक्यातील आमणे येथे उद्घाटनाची योजना होती. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमने या शेवटच्या ७६ किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. ५ जून पासून नागपूरहून थेट मुंबईच्या वेशीवर ८ तासात पोहचता येणार आहे.

मुंबई ते नागपूर हे ७०० किमीचे अंतर समुद्धी महामार्गामुळे ८ ते १० तासात पूर्ण होणार आहे. एक्सप्रेसवेमुळे प्रवासाचा वेळ ८ तास वाचणार आहे. या महामार्गापैकी नागपूर ते इगतपुरी असा 625 किलोमीटरचा टप्पा सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. आमणे ते इगतपुरी हा ७६ किमी शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर गुरूवारपासून संपूर्ण महामार्ग प्रवासासाठी खुला होणार आहे. दरम्यान, फेब्रुवारीमध्ये महामार्गाचे उद्घाटन करण्यात येणार होते. त्यानंतर १ मे ही तारीख निवडली होती. पण उद्घाटनाचे हे दोन्ही मुहूर्त हुकले. आता ५ जून ही तारीख निवडली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाने तातडीने घेण्याचे निर्देश दिल्याने शासन खडबडून जागे झाले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करून विरोधकांना शांत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवासाचे अंतर आणि वेळ वाचणार आहे. मुंबई ते नाशिकचा प्रवास आता ३ तास ४५ मिनिटांऐवजी २ तास ३० मिनिटांत पूर्ण होतो, म्हणजेच १ तास २० मिनिटांची बचत आणि सुमारे ४० किमी अंतर कमी झाले आहे.

मुंबई-नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील ७०१ किमीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा ६ पदरी महामार्ग मुंबईला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राशी जोडतो. हा महामार्ग आर्थिक विकास, रोजगार, पर्यटन आणि कृषी व्यापाराला चालना देतो. सुरक्षित आणि जलद वाहतुकीमुळे इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाला मदत होते. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT