Igatpuri news today Saam tv
महाराष्ट्र

Igatpuri news today : इगतपुरीतील वैतरणा धरणात तिघे जण बुडाले, आठवड्याभरातील तिसरी घटना

Igatpuri latest News : नाशिकच्या इगतपुरीमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातून दुर्देवी घटना समोर आली आहे. इगतपुरीतील वैतरणा धरणात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आठवड्यांतून तिसऱ्यांदा अशी दुर्देवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धरणात बुडून काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा इगतपुरीतील वैतरणा धरणात बुडून तिघांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. धरणावर फिरायला गेलेले असताना हा दुर्देवी प्रकार घडला. या घटनेतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं.

इगतपुरीतील वैतरणा धरणात दोघे जण झारवड शिवारात बुडाले आहेत. तर एक जण वावी शिवारात बुडाल्याची माहिती मिळत आहे. धरणावर फिरायला गेलेल्या पर्यटकांसोबत हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर काल संध्याकाळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्यात अडथळा येत होता. त्यानंतर आज सोमवारी परत बचाव पथक शोधकार्य करण्यासाठी रवाना झाले आहेत. इगतपुरीत आठवड्याभरात तालुक्यात तिसरी घटना घडली आहे. या घटनेतील तिघांची नावे अजून समोर आलेली नाहीत.

जळगावमध्ये अवळाळी पावासाचा फटका; पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू

राज्यात अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. या पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे. या पावसासह वाऱ्यामुळे लोकांच्या घराची पत्र उडून गेली आहेत. तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली. तर जळगावमध्ये रविवारी अवकाळी पाऊस झाला. जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे एक घर कोसळलं. तर या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Announces Board Exam Schedule: दहावी-बारावी बोर्ड परीक्षा अपडेट! केंद्रीय मंडळाने जाहीर केले वेळापत्रक|VIDEO

बायकोचा गळा दाबून खून, नवऱ्यानं मृतदेह बाथरूममध्ये लपवला; लेकीनं आईला पाहिल्यानंतर... नेमकं घडलं काय?

Maharashtra Live News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवानांसोबत दिवाळी

Mumbai Metro : मेट्रो 2B चा पहिला टप्पा कधी सुरू होणार, तारीख आली समोर, चेंबूरकरांना फायदाच फायदा

Crime News : जुगाराचा नवा फंडा! फायटर कोंबड्यांची झुंज लावून पैशांचा खेळ, पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT