Jalgaon News : जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे घर कोसळलं; पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू, चिमुकला थोडक्यात वाचला

Jalgaon Yaval Taluka News : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे घर कोसळलं; पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू, चिमुकला थोडक्यात वाचला
Jalgaon Yaval Taluka NewsSaam TV

गेल्या आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसासह वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात रविवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला.

जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे घर कोसळलं; पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू, चिमुकला थोडक्यात वाचला
Maharashtra Rain Update: राज्यभरात अवकाळी पावसाचं थैमान, वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळली; अनेक ठिकाणी घरांची पडझड

या पावसामुळे आंबा पाणी गावाजवळील थोर पाणी परिसरात एक घर कोसळलं. या घटनेत घरात झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी, लहान मुलगी आणि वृद्ध महिलेचा समावेश आहे. सुदैवाने या घटनेतून ४ वर्षांचा चिमुकला थोडक्यात बचावला आहे.

मात्र, या घटनेत अख्खं कुटुंबच संपलं आहे. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबीय रविवारी रात्रीचे जेवण करून घरात झोपले होते. त्याचवेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अचानक घर कोसळलं.

या घटनेत घरातील चौघेजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. नशीब बलवंत्तर असल्याने या घटनेत ४ वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचले. मात्र, या घटनेत अख्खं कुटुंबच संपलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे घर कोसळलं; पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू, चिमुकला थोडक्यात वाचला
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाढ झोपेतच डंपरने मजूरांना चिरडलं; १ ठार २ गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com