औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर ओवरस्पीड गाडी चालवाल तर भरावा लागले दंड Saam TV
महाराष्ट्र

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर ओवरस्पीड गाडी चालवाल तर भरावा लागले दंड

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : केंद्रानं संशोधित मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर नवीन दंड आकारणी लागू केली आहे. त्यामुळे आता कुठल्याही हायवेवर ओवरस्पीड गाडी चालवली तर चार चाकी साठी दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. परंतु राज्यातील बहुतेक महामार्गावरची स्पीड लिमिट नेकमी किती याचे कुठलेही बोर्ड पहायला मिळत नाहीत. मग वाहनचालकाने कसं समजावं की या मार्गाची स्पीड लिमिट किती आहे. यासाठीच आम्ही औरंगाबाद ते सोलापूर महामार्गावर प्रवास करून वास्तव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.

हा आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 म्हणजे धुळे सोलापुर महामार्ग. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणतात टोल भरा, औरंगाबाद ते सोलापूर केवळ चार तासात पोहचाल. मात्र, राज्याच गृहखातं म्हणताय खबरदार 90 च्या स्पीड च्या पुढे गाडी चालवाल तर दोन हजार रुपये दंड भरावा लागेल.

धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता चार पदरी आणि अत्यंत गुळगुळीत आहे. देशाच्या पंतप्रधानांनी या महामार्गाचे उद्घाटन आणि लोकार्पण केलं आहे. सुरुवातीला हा महामार्ग लोकांसाठी सुखकर होता मात्र, गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) ते सोलापूर महामार्गावर पोलिसांच्या वाहनांच्या गती मोजून दंड देणाऱ्या गाड्या लोकांची डोकेदुखी ठरत आहेत.

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरची स्पीड लिमिट आणि दंड आकारणी कशी

- चारचाकी गाडीसाठी स्पीड लिमिट आहे प्रति ताशी 90 किमी . आणि नियमांचे उल्लंघन केल्यास दोन हजाराचा दंड.

- ट्रक आणि मोठी वाहन प्रति किमी 70 आणि दंड 2000

- मोटारसायकल साठी 70 लिमिट आहे गंड 2000

- विनाहेल्मेट ही कारवाई करते त्यासाठी तुम्हाला 500 दंड लागेल.

एखादा सराईत चोर पकडण्यासाठी देखील एवढा सापळा लावला नसेल.(थोडे व्हिज .) सहाजिकच लोकांना अपघातापासून वाचवण्यासाठी नाही तर अशा पद्धतीने गाड्या केवळ दंड वसुली साठी आणि सरकारच्या तिजोरी भरण्यासाठी लावल्या जात असल्याचं यावरून स्पष्ट होतं. यावर आम्ही पोलिसांना (Police) विचारलं की ,जर या रस्त्यावर स्पीड लिमिट काय आहे, याचा कुठलाही बोर्ड नाही. तर लोकांनी कसं समजावं की आपल्याला किती स्पीडने चालायचा आहे. त्यावर पोलिसांनी वेगळं उत्तर दिलं आहे. पोलिसांनी वारंवार हायवे अथोरिटीला आणि टोल कन्स्ट्रक्शन कंपनीला स्पीड लिमिट चे बोट लावण्यासाठी सूचना केल्या, पत्रव्यवहार केला. यावर आम्ही आय आर बी कंट्रक्शन कंपनीची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद ते सोलापूर महामार्गावर टोल किती वाहनचालकाला किती टोल भरावा लागतो औरंगाबाद ते सोलापूर अशा स्पीड मोजणाऱ्या गाड्या किती आहेत आणि त्या रोजचा किती दंड वसूल करतात यावर एक नजर टाकूया.

औरंगाबाद ते सोलापूर महामार्ग 330 किलोमीटरचा आहे.

वाहन चालकाला पाच वेळा टोल भरावा लागतो.

औरंगाबाद सोलापूर जाऊन येण्यासाठी साधारणपणे सहाशे रुपयांचा टोल आहे.

या महामार्गावर पोलिसांच्या स्पीड मोजणाऱ्या सात गाड्या आहेत. प्रत्येक गाडी साधारणपणे 100 लोकांना पावती देते ,दंड लावते.

सरासरी दोन हजार रुपयांचा दंड पाहता. सात गाड्यांचा सरासरी रोजचा दंड 10 ते 12 लाखा पर्यंतचा असतो .

पोलीस प्रशासन सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानंतर हा दंड लावल्यास सांगतो आणि अपघाताचे प्रमुख प्रमाण कमी करण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचं सांगतो. मग प्रश्न हा आहे ,अपघात दिवसाच होतात का? कारण कुठल्याही महामार्गावर रात्रीच्या गाड्या पहायला मिळत नाहीत.कारण समोरच्या गाडीचा हेडलाईट मुळे त्यांना नंबर कॅच करता येत नाही. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी म्हणतात या महामार्गावर शंभर ची स्पीडने गाडी चालवता येतील मात्र पोलिस म्हणतात नव्वद दोन खात्यात ताळमेळ नाही.

मंडळी रस्त्यावर ती जर वाहन चालकाला स्पीड किती आहे याची माहितीच नसेल तर त्यांच्याकडून दंड वसूल करावा का? बरं राज्यातील प्रत्येक महामार्गावर ची स्पीड वेगवेगळी आहे वाहक रोबोट थोडाच आहे .प्रत्येक ठिकाणची स्पीड लक्षात ठेवायला. ही केवळ औरंगाबाद सोलापूर महामार्गाची नाहीतर राज्यभरातील महामार्गाची व्यथा आहे .त्यामुळे अपघाताच्या प्रमाण कमी करण्याच्या हेतूने ही दंड वसुली सुरू आहे की, सरकारी तिजोरी भरण्यासाठी हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. गडकरी साहेब या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या. विरोध दंड लावायला नाही बोर्ड का नाही त्याला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

UPSC चा आणखी एक घोटाळा, मुख्य परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप!

SCROLL FOR NEXT