राजकारण सोडून शेतीला सुरवात; दोन महिन्यात महिलेने कमावला 7 लाखांचा नफा

रोपे आणि औषध याला एक लाख रुपये खर्च वजा करता एक एकर मध्ये तीन महिन्यात सात लाख रुपये निव्वळ नफा त्यांना होणार आहे.
राजकारण सोडून शेतीला सुरवात; दोन महिन्यात महिलेने कमावला 7 लाखांचा नफा
राजकारण सोडून शेतीला सुरवात; दोन महिन्यात महिलेने कमावला 7 लाखांचा नफाSaam TV
Published On

पुणे : मावळ तालुक्यातील गहूंजे गाव हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी प्रसिद्ध गाव. पण हे गाव शेतीसाठी देखील तितकेच प्रसिध्द आहे. आता गाव म्हणलं की राजकारण पण आलंच... अशाच या गावातील एक महिला राजकारण सोडून आता शेती करू लागली आहे.. काय आहे राजकारण सोडून शेती करण्या मागचं या महिलेचं रहस्य जाणून घेऊया. वर्षा बोडके मावळ मधील गहूंजे येथील प्रयोगशील शेतकरी (Farmer) म्हणून त्यांना ओळखले जाते तर त्यांची दुसरी ओळख म्हणजे त्या याच गावाच्या महिला उपसरपंच होत्या. मागील दीड महिन्यापासून त्यांनी राजकारण सोडून शेतीची कास धरून त्याला कष्टाची जोड दिली. त्यांनी एक एकर शेती मधून फुलांच्या विक्रीतून दोन महिन्यांत फुलांच्या विक्री तून तब्बल पाच लाख रुपये मिळाले. आणखी तीन लाख रुपये मिळण्याची अपेक्षा त्यांची आहे. रोपे आणि औषध याला एक लाख रुपये खर्च वजा करता एक एकर मध्ये तीन महिन्यात सात लाख रुपये निव्वळ नफा त्यांना होणार आहे.

राजकारण सोडून शेतीला सुरवात; दोन महिन्यात महिलेने कमावला 7 लाखांचा नफा
करुणा मुंडेंनी केली नव्या पक्षाची घोषणा; धनंजय मुंडें विरोधात निवडणूक लढवण्याचीही तयारी

वर्षा यांचं ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण झालं आहे. समाजकार्य करण्या करीता त्या राजकारणात आल्या मात्र आताच्या राजकारणात त्यांचं मन रमत नव्हतं. राजकारणातून मिळणारा मोठेपणा घेण्यापेक्षा सुधारित शेती करून मिळवलेले विक्रमी उत्पादन हे महिलांची मान उंचावणारी असल्याचा विचार करून वर्षा बोडके यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला पती संजूकुमार बोडके यांनी मोठी साथ दिली. आपल्या वडिलोपार्जित चार एकर शेतात त्यांनी संकरित झेंडूच्या फुलांची शेती करण्याचं ठरवलं. त्यासाठी दारुंब्रे मधून झेंडूची रोपे आणली. जमीन सपाट केली. गाडी वाफे तयार केले. रोपे लावली पाण्याचं योग्य नियोजन करत पाटाने पाणी देण्या ऐवजी द्रिपच्या साह्याने पाणी दिले.

राजकारण सोडून शेतीला सुरवात; दोन महिन्यात महिलेने कमावला 7 लाखांचा नफा
IPL 2022: ब्रायन लारा SRH चा फलंदाजी कोच तर स्टेनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

हे सर्व वर्षा बोडखे स्वतः करतात. आणि कीटक औषधही फवारणीही त्या करतात. मजुरांची कमतरता असल्याने आपले पती आणि दोन मुले त्यांना फुले तोडण्यास मदत करतात. त्यामुळे मजूरही लागत नाही आणि मजुरीची बचत होते. आता लग्नसराई आहे. गावो गावच्या यात्र, आणि सनही आहे. त्यामुळे वर्षा बोडखे यांच्या फुलांना चांगलीच मागणी आहे. समाजातील इतर महिलांनी देखील अस काहीसं पाऊल उचलून सक्षम बनलं पाहिजे असंही त्यांना वाटतं. मावळ हा पुण्याच्या जवळचा तालुका आहे. त्यामुळे शहरीकरना सोबत कॉंक्रिटीकरणाचं जंगलही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे येथील शेतकरी शेतीपासून दूर जात आहे.

मात्र वर्षा बोडखे यांनी शेतीत वेगळे वेगळे प्रयोग करतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात म्हणून त्या शेतीत यशस्वी झाल्या आहे. वातावरणात जरी बदल होत असली तरी नव नवीन तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने उपयोग केला पाहिजे. आपण आपल्या शेतात कोणते बीज लावणार आहे त्याची सर्व तांत्रिक पद्धतीची माहिती घेतली पाहिजे आपली शेती कोणत्या पद्धतीचे आहे. फवारणी कीड अन्न द्रव याचीही माहिती पाहिजे. आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन पिकाची निवड केली पाहिजे. जर शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आणि बाजारपेठेचा अंदाज घेतला खते औषधे यांचा योग्य उपयोग केला तर शतकरी नक्कीच यशस्वी होऊ शकतो ते वर्षा बोडखे या महिला शेतकऱ्यांनी दाखऊन दिले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com