Ahmednagar | Petrol पंपावर ATM कार्ड वापरत असाल तर हि बातमी नक्कीच वाचा... सचिन आगरवाल
महाराष्ट्र

Ahmednagar | Petrol पंपावर ATM कार्ड वापरत असाल तर हि बातमी नक्कीच वाचा...

पेट्रोल पंपावर एटीएम कार्ड वापरताना त्या कार्डाचे स्कॅनिंग करून डाटा चोरणे व त्याआधारे बनावट एटीएम कार्ड तयार करून नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे लुटणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आलं आहे.

सचिन आगरवाल

अहमदनगर : पेट्रोल पंपावर एटीएम कार्ड वापरताना त्या कार्डाचे स्कॅनिंग करून डाटा चोरणे व त्याआधारे बनावट एटीएम कार्ड तयार करून नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे लुटणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आलं आहे. अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी या आरोपीला ठाणे येथून अटक केली आहे. सुजित राजेंद्र सिंंग असे या आरोपीचे नाव आहे अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे देखील पहा :

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. या आरोपींनी मे महिन्यात एटीएम कार्ड क्लोन करून वेगवेगळ्या एटीएममधून पैसे काढत एक लाख 44 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा अहमदनगरच्या भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना एटीएम सेंटर येथील सीसीटीव्ही फुटेजवरून दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं होत. धीरज अनिल मिश्रा व सुरज अनिल मिश्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून 31 बनावट एटीएम कार्ड व 2 लाख 61हजार 500 रुपये हस्तगत करण्यात आले होते. त्यांच्याकडे अधिकची चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुजित राजेंद्र सिंग हा असल्याचे समोर आले. तेव्हापासून सुजित हा फरारी होता.

11 सप्टेंबरला अहमदनगर सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना सुजित सिंग हा वसई येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अहमदनगरच्या सायबरचे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे, गणेश पाटील, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तेथे सापळा लावला आणि मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला असून यात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आपले एटीएम कार्ड वापरताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी नागरिकांना केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

वाचकहो हेही वाचा :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

SCROLL FOR NEXT