Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : शिवसेना, धनुष्यबाणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर...; ठाकरे गटाचा प्लान तयार

आयोगाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ठाकरे गटाचा प्लान तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Shivaji Kale

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह या संदर्भात आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. आज होणाऱ्या सुनावणीत निवडणूक आयोग या संदर्भात निर्णय देऊ शकतो. आयोगाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ठाकरे गटाचा प्लान तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला तर ठाकरे गटाने त्यादृष्टीनेही तयारी केली आहे. त्यांनंतर ठाकरे गट जनतेत जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गट जनतेतून पक्षाचं चिन्ह आणि नाव मागवणार असल्याचं बोललं जात आहे.

तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी करत आहे, अशी माहिती मिळत आहे. आमदार-खासदारांच्या संख्येनुसार निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सादिक अली खटल्यानुसार निकाल लागला तर शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार अशीही शक्यता आहे. त्यामुळे  उद्धव ठाकरे गटाने तशी तयारी केली आहे.

कायद्यानं कोणाचं पारडं जड?

निवडणूक आयोगातील सुनावणीआधीच पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याचे अंदाज लावले जात आहे. त्यातच शिंदे गट सादिक अली केसचा दाखल देत सातत्यानं पक्ष आणि पक्ष चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा करत आहे. निवडणूक आयोगाने विधानसभेतील आणि लोकसभेतील सदस्यांची संख्या हा निकष समोर ठेऊन निर्णय दिला तर शिंदे गटाचं पारडं जड दिसत आहे.

मातोश्रीवरील हालचाली वाढल्या

निवडणूक आयोगाकडे सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत 12 वाजता मातोश्री येथे पोहचले आहेत. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चंद्रपूर, गोदिंया, गडचिरोलीला रेड अलर्ट

Bullet Train: मुंबईकर प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबईतील २ मेट्रो बुलेट ट्रेनला जोडणार

MS Dhoni : एमएस धोनी किती कोटींचा मालक?

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Pro Govinda Season: आजपासून ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

SCROLL FOR NEXT