IDBI Bank Employees Go on 2-Day Strike SAAM TV
महाराष्ट्र

जळगावात खळबळ! आयडीबीआय बँकेचे कर्मचारी २ दिवस संपावर; 'हे' आहे मुख्य कारण

IDBI Bank strike Jalgaon : आयडीबीआय बँकेचे खासगीकरण आणि प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपा मुळे बँकिंग व्यवहारांवर आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Saam Tv

विदेशी कंपनीला बँक विकण्याचा घाट घालून आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करण्याचा विरोध तीव्र झाला आहे. या खासगीकरणाविरोधात जळगावातील आयडीबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत दोन दिवसांचे 'काम बंद' आंदोलन पुकारले आहे. बँकेच्या या धोरणाचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी गुरुवारी शहरातील काव्यरत्नावली चौकात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.

केंद्र सरकारकडून आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करून ती विदेशी कंपनीच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात संपूर्ण देशातील बँक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून, त्याचाच एक भाग म्हणून जळगावातील युनिटनेही काम बंद ठेवून आपला तीव्र रोष व्यक्त केला.

विशेष म्हणजे, ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या दोन दिवसांच्या संपामुळे आयडीबीआय बँकेच्या नियमित कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी आणि आर्थिक व्यवहारांसाठी आलेल्या ग्राहकांना बँकेचे दरवाजे बंद मिळाल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांनी सरकारला आणि व्यवस्थापनाला इशारा दिला आहे. बँकेचे चाललेले खासगीकरण तातडीने थांबवण्यात यावे आणि कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. जर प्रशासनाने यावर योग्य निर्णय घेतला नाही आणि मागण्या मान्य केल्या नाहीत, तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल. तसेच आगामी काळात कोणत्याही पूर्वसूचनेविना 'बेमुदत काम बंद' आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे. या आंदोलनामुळे आगामी काळात बँकेचे कामकाज आणखी विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News : मोठी बातमी! विमानात अचानक तांत्रिक बिघाड, ३ खासदारांसह ६७ प्रवासी करत होते प्रवास

Blouse Desing For Festival Saree: सण-समारंभात उठून दिसायचंय? हेवी साडीसाठी निवडा ब्लाउजचे ७ ट्रेंडी सुंदर डिझाइन्स

Maharashtra News Live Update: सातारा न्यायालयानंतर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Dapoli : दिवाळीच्या सुट्टीत दापोलीला जाण्याचा प्लान करताय? 'ही' ७ सुंदर ठिकाणं फिरायला विसरू नका

Cloth Vastu: धुतलेले कपडे कुठे वाळवताय? वास्तुशास्त्राचा हा नियम माहिती नसेल तर एका रात्रीतच होऊ शकता कंगाल

SCROLL FOR NEXT