Mla Prakash Awade join BJP Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Politics: कोल्हापुरात भाजपची ताकद वाढली, अमित शहा यांच्या उपस्थितीत बड्या नेत्याने केला BJP मध्ये प्रवेश

Mla Prakash Awade join BJP: आमदार प्रकाश आवाडे यांनी अमित शहा यांच्या उपस्थित भाजपमध्ये केला प्रवेश.

Saam Tv

कोल्हापूरमध्ये भाजपणही ताकद वाढली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात भापजमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ (Ichalkaranji Assembly constituency) हा महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघातूंन 2019 च्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून प्रकार आवाडे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर आवाडे महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता.

गेली अनेक महिने प्रकाश आवाडे हे भापजध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आज अधिकृत रित्या प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीतचं भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.

विशेष म्हणजे ज्या सुरेश हळवणकर यांचा प्रकाश आवाडे यांनी पराभव केला होता, त्याच सुरेश हळवणकर यांनी प्रकाश आवाडे यांना भाजपच्या व्यासपीठावर घेऊन आले आणि आज त्यांचा प्रवेश पूर्ण झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे , केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक उपस्थितीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT