IAS Tukaram Mundhe saam tv
महाराष्ट्र

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, MPSC पेपरफुटी प्रकरणात घेतला मोठा निर्णय, थेट आदेशच काढला

IAS Tukaram Mundhe : एमपीएससी परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला आहे. तक्रारीसाठी ईमेल आणि संपर्क क्रमांकही जारी करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Tukaram Mundhe : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षा पेपरफुटीच्या कथित प्रकरणाची चौकशी आयोगामार्फत केली जाणार आहे. या चौकशी आयोगात तुकाराम मुंढेंचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले या समितीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान आयोगाचं कार्यालय मुंबईत सुरू करण्यात आलं आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत ज्यांना माहिती द्यायची आहे, तक्रार करायची आहे ते करू शकतात असं आज तुकाराम मुंढे यांनी आज सांगितलं. एकूण ९ परीक्षांची चौकशी आयोगातर्फे केली जाणार आहे. याची यादीही समोर आली आहे.

एमपीएससी परीक्षांबाबतची निवेदने १६ नोव्हेंबरपर्यंत चौकशी आयोगाकडे पाठविण्याचे आवाहन चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे. या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेले परीक्षार्थी किंवा विद्यार्थी व अन्य व्यक्तींनी तसेच संबंधित नोंदणीकृत संस्थांनी आपल्या निवेदनाची व कागदपत्रांची एक प्रत complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवरही पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तक्रारी दाखल करण्यासंदर्भात आवश्यक माहिती किंवा मदतीकरीता चौकशी आयोग कार्यालयाचा 022-20867677 हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

IAS Tukaram Mundhe

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे. सदर चौकशी आयोगाचे कार्यालय दालन क्र. 201, दुसरा मजला, अन्न व औषध प्रशासन भवन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), बांद्रा (पूर्व), मुंबई - ५१ येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेल्या व्यक्ती, परीक्षार्थी/विद्यार्थी यांनी आपले निवेदन १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगासमोर मांडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

साक्षीसाठी बोलावण्याचा अधिकार आयोगाकडे चौकशी आयोगाच्या या जाहीर सूचनेला प्रतिसाद म्हणून दाखल करण्यात आलेली प्रतिज्ञापत्रे आणि कागदपत्रे गोपनीय ठेवण्यात येतील. निवेदनांची छाननी करून संबंधित व्यक्तीला आयोगासमोर साक्षीदार म्हणून तपासायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाकडे राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Hemorrhage : वयाच्या 35 व्या वर्षी ब्रेन हॅमरेज! तरुणांनो, BP कडे दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली धोक्याची कारणे

चक्रीवादळाचा मार्ग बदलला; 14 राज्यांमध्ये कोसळणार धो-धो, 72 हजार नागरिकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी जाहीर

एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना पक्ष होऊ शकत नाही; सुप्रीम कोर्टात खळबळजनक सुनावणी| VIDEO

DIY Floor Cleaning Tool: वाकून फरशी पुसताना कंबर दुखतेय? मग वापरा हा २ मिनिटांत तयार होणारा मॉप, उभ्यानेच होईल सफाई

Panjab Election : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस धक्का, कंबोज यांचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT