Tukaram Mundhe Announced New Guidelines for Restaurants:  saam tv
महाराष्ट्र

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Tukaram Mundhe Announced New Guidelines for Restaurants: एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी 'सुरक्षित अन्न, आरोग्यदायी महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Bharat Jadhav

  • 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' मोहीम राज्यभर सुरू करण्यात आली आहे.

  • तुकाराम मुंढे यांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत.

  • व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची स्वतंत्र व्यवस्था ठेवण्याचे निर्देश

अन्न व औषध प्रशासनाने राज्यात 'सुरक्षित अन्न, 'निरोगी महाराष्ट्र' ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. तर जे कोणी नियमांचं उल्लंघन करतील अशा हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे मालकांना सोडणार नाही, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलाय. हॉटेलवाल्यांना इशारा देतानाच तुकाराम मुंढेंनी हॉटेलसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. एफडीएने आखून दिलेल्या नियमानुसार हॉटेल्सचे किचन नसेल.त्यामध्ये अस्वच्छता दिसल्यास कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Tukaram Mundhe Announced new hotel rules in Maharashtra)

आरोग्य विषयी नियमांचं पालन करताना काही नियम ठरलेले आहेत, त्या नियमांचं सर्वांनी पालन करणं बंधनकारक असेल. जर नियमांचं पालन केलं तर घाबरण्याचं कारण नाही. पण नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही, असा कडक इशारा मुंढे यांनी दिला आहे. एफडीएच्या नियमांनुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, धाबे, मिठाईवाले, बेकऱ्या आणि ज्या ठिकाणी अन्नावर प्रक्रिया केली जाते, त्यांचे किचन म्हणजे स्वयंपाक घर कसं असावं, त्या संबंधित नियम काय आहेत याची माहितीही त्यांनी आज दिली आहे.

हॉटेलचं किचन कसं असावं?

भिंती आणि फ्लोअर या टाईल्सच्या असाव्यात. त्या टाईल्स वॉशेबल असाव्यात. त्यातून पाणी झिरपू नये.

किचनमध्ये पुरेशी हवा खेळती हवी. तसेच किचनला एक्झॉस्ट असावा.

कच्चा मालासाठी वेगळा सेक्शन असावे.

स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन असावे. यात कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे असावे.

किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवले पाहिजेत. इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत.

किचनमध्ये पेस्ट कंट्रोल नियमित केले पाहिजे. अन्नाच्या ठिकाणी किडे, झुरळ, पाल, उंदरांचा प्रादुर्भाव नसावा. यासह ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी पाणी, हँडवॉश, साबण, टॉवेल ठेवण्यात यावेत.

अनेक हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये ग्राहक गेल्यानंतर त्याच्या समोर बाटलीबंद पाणी आणून ठेवतात. आता अशा हॉटेल चालकांना तुकाराम मुंढें लगाम घातलाय. ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी हे मोफत उपलब्ध करून द्या, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

Oxidized Jewellery : नवरात्रीसाठी प्रत्येक मुलीकडे असावीत ‘हे’ ७ प्रकारचे ट्रेंडी ऑक्सिडाइज्ड दागिने

ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणाचा पुरावा रायगडात सापडला, सत्य येणार बाहेर; SITच्या हाती काय लागलं?

SCROLL FOR NEXT