FDA Commissioner Tukaram Mundhe appeals to citizens to report food adulteration and strengthen food safety enforcement across Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

IAS Tukaram Mundhe: खाद्यपदार्थांत भेसळ आढळली तर? तुकाराम मुंढे यांच्याकडे ऑनलाईन तक्रार कशी कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

FDA Complaint Process: एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना अन्नभेसळीबाबत तक्रार करण्याचे आवाहन केलंय. तक्रार करण्याची संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • अन्न भेसळ तक्रार ऑनलाइन कशी करावी

  • तुकाराम मुंढे एफडीए तक्रार प्रक्रिया

  • भेसळयुक्त अन्नाची तक्रार कुठे करावी

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी करावायांचा धडाका लावला आहे. एफडीएच्या कारवाईचा धडका पाहून अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. जर तुम्हालाही कुठे अन्नपदार्थांमध्ये भेसळ झाल्याचं दिसून आलं असेल तर थेट एफडीएकडे तक्रार करावी. याबाबत खुद्द तुकाराम मुंढे यांनी आवाहन केलंय. आता प्रश्न येतो तो म्हणजे एफडीएकडे तक्रार करायची कशी?

१५ जुलै रोजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तक्रार कशी करावी, याची माहिती दिली होती. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने AI-सक्षम नागरिक तक्रार पोर्टल तयार केलंय. यात कोणताही नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून भेसळयुक्त अन्न, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे, तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवू शकतो.

कारण एआय आपोआप आपल्यापरीने तक्रार तयार करते. तसेच ही तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते. विलंब झाल्यास स्वयंचलित एस्कलेशन करते आणि तक्रारीचा संपूर्ण प्रवास पारदर्शकपणे ट्रॅक करता येतो.

तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार कशी करावी?

नागरिकांना आपली तक्रार नोंदविण्यासाठी मुंढे यांनी https://complaints.mahafda.in ही अधिकृत वेबसाईटही शेअर केली. या साईटवर जाऊन एका क्लिकवर तक्रार सबमिट करा आणि तिची स्थिती ट्रॅक करता येईल.

ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची पद्धत

एफडीएच्या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तक्रार करता येते. त्यासाठी complaints.mahafda.in या ऑनलाईन संकेतस्थळाला भेट द्या. होमपेजवर “तक्रार नोंदवा” याला क्लिक करा.

तुमचा १० अंकी मोबाईल क्रमांक टाका.

वन-टाईम पासवर्ड (OTP) टाकून पडताळणी पूर्ण करा.

त्यानंतर तक्रारीचा प्रकार यात भेसळयुक्त अन्न, कालबाह्य (Expired) उत्पादन, निकृष्ट दर्जाचे औषध, बनावट औषध, चुकीचे लेबलिंग, अस्वच्छता, इतर FDA संबंधित तक्रारीचा प्रकार निवडावा. यानंतर तक्रारीची सविस्तर माहिती भरा.

त्यात दुकान/हॉटेल/कंपनीचे नाव, पूर्ण पत्ता, घटनेची तारीख व वेळ, उत्पादनाचे नाव, बॅच क्रमांक (असल्यास) काय समस्या आढळली याची माहिती द्यावी.

शक्य असल्यास उत्पादनाचे फोटो, बिलाची प्रत, व्हिडीओ, पॅकेजिंगचे फोटो, इतर संबंधित पुरावे यांसारखे पुरावे अपलोड करावीत.

घटना ज्या ठिकाणी घडली, ते ठिकाण नकाशावर किंवा पत्त्याद्वारे त्याची माहिती द्या.

सर्व माहिती तपासून Submit बटनावर क्लिक करा.

त्यानंतर प्राप्त झालेला तक्रार क्रमांक तुमच्याकडे जपून करून ठेवा.

ऑनलाईन तक्रार शक्य नसल्यास टोल-फ्री हेल्पलाईन: १८००-२२२-२६५ या टोल फ्री क्रमांकावरूनही तक्रार दाखल करता येते. जर प्रकरण गंभीर असल्यास आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यालयात जावे.

यादरम्यान तक्रार दाखल करताना संबंधित अन्नपदार्थांच्या खरेदीचे बिल आणि वस्तूचे पॅकिंग, तसेच फोटो जवळ ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाला संबंधित विक्रेत्यावर किंवा कंपनीवर धाड टाकून कायदेशीर कारवाई करणे सोपं जातं. लक्षात ठेवा खोटी किंवा दिशाभूल करणारी तक्रार केल्यास त्यांच्याविरुद्धता कायदेशीर कारवाई होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोहारा तालुक्यातील सलगरा दिवटी परिसरातील पवनचक्कीला आग

Jana Nayagan: 'जन नायकन'साठी थलापती विजय यांनी घेतलं तगडं मानधन, 'या' अभिनेत्रीला मिळाली सर्वात कमी फी

मोड आलेली मटकी खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?

NEET Paper Leak: विद्यार्थी आंदोलनादरम्यान मोठी घडामोड, नीट पेपर फुटीप्रकरणातील मुख्य आरोपीला क्लिनचीट

सरकारकडून २४ तासात ४ वेळा प्रस्ताव; नड्डांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात होणार चर्चा, CJPकडून मात्र नकार

SCROLL FOR NEXT