Pooja Khedkar Saam Digital
महाराष्ट्र

IAS Pooja Khedkar : पुणे जिल्हाधिकाऱ्यांवरील लैंगिग छळाचे आरोप खरे की खोटे? पूजा खेडकर यांचं 'ते' पत्र आलं समोर

IAS Pooja Khedkar Case Update : माजी प्रोबेशनरी आयएएस आधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात लिहलेलं पत्र समोर आलेलं आहे. मात्र यात लैंगिक छळाचे आरोप करण्यात आलेले नाहीत.

Sandeep Gawade

माजी प्रोबेशनरी आयएएस आधिकारी पुजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात लिहलेले पत्र साम टीव्हीच्या हाती लागलं आहे. पत्रात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिग छळाचे आरोप नसल्याचं समोर आलं आहे. ⁠दिवसेंनी सातत्याने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, या पत्रात करण्यात आला आहे.

दिवसेंनी शासनाला पाठवलेला अहवाल व्हायरल झाल्याने बदनामी झाल्याचे पूजा खेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे. अहवालामुळे मी उद्दाम आधिकारी असल्याची प्रतिमा निर्माण झाली. ⁠दिवसे यांनी पुण्यातून खेडकर यांची बदली करण्याची केलेली मागणी मान्य न करण्याची विनंती पत्रात करण्यात आली होती. ⁠बदली झाल्यास जममानसात आपणच दोषी असल्याची प्रतिमा तयार होईल, असं पूजा खेडकर याचं म्हणंणं होतं. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पूजा खेडकर यांनी पत्र लिहून दिवसे यांच्या विरोधात तक्रार केली होती.

पूजा खेडकर यांनी युपीएसीची फसवणूक केल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे युपीएसीने गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्यांची तात्पुरती नियुक्तीही रद्द केली असून, निर्दोष सुटका झाली तरचं त्यांना आता युपीएसीची परीक्षा देता येणार आहे. अन्यथा आयोगाच्या कोणत्याही परीक्षेला बसता येणार नाही. या प्रकरणादरम्यान पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी तक्रार नोंद केली होती. त्याविरोधात सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरविरोधात अब्रूनुकसानीचा दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान पूजा खेडकर यांनी दिवसे यांच्याविरोधात लिहलेले पत्र साम टीव्हीच्या हाती लागलं आहे. पत्रात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिग छळाचे आरोप नसल्याचं समोर आलं आहे. ⁠दिवसेंनी सातत्याने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, या पत्रात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT