वादग्रस्त प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडून पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं आहे. हे प्रमाणपत्र मिळवताना पूजा खेडकर यांनी त्यांच्याकडे कोणतेही अपंगत्व प्रमाणपत्र नसल्याची माहिती दिली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अपंगत्व प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती समोर आली आहे.
पूजा खेडकर यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचा उघड झाला आहे. कारण खेडकर यांनी याआधी युपीएससीला अपंगत्वाची दोन प्रमाणपत्र दिली आहेत आणि याच प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी यूपीएससीमध्ये आयएएस पद मिळवल आहे. म्हणजेच पूजा खेडकर यांनी यूपीएससीला खोटी माहिती दिली आहे, यूपीएससीची दिशाभूल केली आहे असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. फौजदारी स्वरूपाचा हा गुन्हा आहे त्यामुळे खेडकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील विजयकुमार यांनी केली आहे.
पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीमध्ये आणखी वाढताना दिसत आहेत. दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची पुणे लाचलुचपत विभाग म्हणजेच एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. खेडकर कुटुंबीयांच्या नावावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा अहवाल एसीबी कार्यालयाकडे देण्यात आला आहे.
पूजा खेडकर यांनी ११ वेळा यूपीएससी परीक्षा परीक्षा दिली होती. या परिक्षेसाठी पूजा खेडकर यांनी नावातही बदल केला होता. त्यानंतर त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळालं, याचीही माहिती समोर आली आहे. त्यांना ५१ टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. २०१८ साली दिव्यांगाचं ४० टक्के प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. तर २०२१ साली मानसिक आजाराचे २० टक्के असे दोन्ही मिळून ५१ टक्के दिव्यांगाचं प्रमाणपत्र देण्यात आले होते. आता पिंपरी चिंचवडच्या YCM रुग्णालयातून खोटी माहिती देऊन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.