IAS Pooja Khedkar Saam Digital
महाराष्ट्र

IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांना UPSC चा दणका; IAS अधिकारी पद रद्द

Sandeep Gawade

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना UPSC ने दणका दिला आहे. UPSCनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलंय. शिवाय त्यांना यापुढच्या काळात सिव्हील सर्विसेस नियमांअंतर्गत परिक्षाही देता येणार नाही. त्यांची उमेदवारीही आयोगाने रद्द केलीये. साम टीव्हीनं पूजा खेडकर आणि तिच्या कारनाम्यांचा वेळोवेळी पर्दाफाश केला होता. अखेर सामच्या बातमीचा दणका बसला आणि UPSCनं कारवाई केली. दरम्यान पूजा खेडकरवर IAS पद का रद्द झालंय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून..

पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र बनावट

2022च्या नियमांच्या तरतुदींचं उल्लंघन

जास्त वेळा परीक्षा देण्यासाठी पालकांच्या नावात बदल

UPSCच्या भविष्यातील सर्व परीक्षा देण्यास मनाई

याप्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली. तेव्हा वकीलांकडून काय युक्तिवाद करण्यात आला आणि कोर्टात नेमकं काय घडलं?

पूजाचे वकील

पूजा यांनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यामुळे त्यांच्याविरोधात आरोप

AIIMS डॉक्टरांच्या मते पूजा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या श्रेणीत

आम्हाला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावले आहे

यामुळेच आम्ही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय

सरकारी वकील

या केसमध्ये भावनांना कुठेही थारा दिला जाऊ नये

2021मध्ये अपंगात्वासाठीच्या मेडिकल तपासणीला गैरहजर

जामीन मिळाला तर पूजा चौकशीला सहकार्य करणार नाही

यूपीएससीचे वकील

पूजाने सातत्याने नाव बदललं

आईचं नाव बदललं, वडिलांचं नाव अनेकदा बदललं

तिने संपूर्ण व्यवस्थेसोबत फ्रॉड केला आहे

एका प्रामाणिक उमेदवाराची संधी तिने हिरावून घेतली

पुजा खेडकरवर बनावट कागदपत्र सादर करणं आणि फसवणूकीचे आरोप आहे. त्यानुसार त्यांची चौकशी पोलिसांनाही करायची आहे. त्यासाठी खेडकर या न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी ही गेल्या आहेत. मात्र त्या निर्णया आधी UPSCनं खेडकरांना दणका दिलाय. त्यामुळे आता पुजावर पोलीस काय कारवाई करणार हेच पाहायचं...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT