नितेश राणे कुठे आहेत ते मला माहित, पण मी का सांगू?- नारायण राणे Saam Tv
महाराष्ट्र

नितेश राणे कुठे आहेत ते मला माहित, पण मी का सांगू?- नारायण राणे

कोण अजित पवार मी ओळखत नाही असे म्हणत नारायण राणेंनी त्यांनाही लक्ष केले आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर : संतोप परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नितेश राणे यांच्यावर आरोप झाले आहेत त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यांनी नितेश राणे कुठे आहेत मला माहितीये पण मी का सांगू? त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत असल्याचं राणे म्हणाले. राज्याचा डिजी, राज्यातले पोलीस कशाला आले आहेत, मारहाण किरकोळ झाली आहे मग कशाला आले आहेत. नितेश राणे काय आतंकवादी आहेत का? एका आमदारासाठी एवढी यंत्रणा कशाला. उजव्या बाजूला खरचटल्यावर 307 लावतात हे मी पहिल्यांदाच बघतोय असे नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले. त्याचबरोबर पोलिसांनी दवाखान्यात जाऊन आपल्या पत्नीची चौकशी केल्याचं सांगितलं आहे.

कोण अजित पवार मी ओळखत नाही....

नारायण राणे यांनी बोलतना अजित पवार (Ajit Pawar) यांनाही लक्ष केले आहे. अजित पवार यांनी नुकतेचं म्याव म्याव आवाज काढण्यावरुन नितेश राणे यांना नाव न घेता टोला लगावला होता, त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले कोण अजित पवार मी ओळखत नाही. ज्या अजित पवारांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला त्यांच्याबद्दल काय विचारता असे म्हणत राणेंनी अजित पवारांना लक्ष केले आहे.

आदित्य ठाकरेंचा आवाज तसा नाही...

नितेश राणेंनी (Nitesh Rane) काही दिवसांपुर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंना (aditya thackeray) बघून म्याव म्याव आवाज काढला होता, त्यावर नारायण राणेंना विचारलं असता ते म्हणाले ''आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा काय संबंध, मला तरी वाटतं त्यांचा आवाज तसा नाही''. या प्रकरणाने विधिमंडळात देखील नितेश राणे यांनी माफी मागावी म्हणून शिवसेनेच्या सदस्यांनी आवाज उठवला होता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT