Chief Minister Saam Tv
महाराष्ट्र

CM Shinde: ...मी अजून ८ महिने आहे; मुख्यमंत्रीपदासंदर्भात एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Chief Minister : पालघर जिल्ह्यातील मनसे,राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे वरळी मधील माजी नगरसेविका रत्ना महाले यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

Bharat Jadhav

(आवेश तांदळे)

CM Shinde in Palghar :

पालघर जिल्ह्यातील मनसे,राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार अपात्र निर्णयापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची मुख्यमंत्री पदाविषयी मोठं वक्तव्य केलं. मी अजून ८ महिने आहे म्हणून आपल्याला फिरावं लागणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

पालघर जिल्ह्यातील मनसे,राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेत शिंदे गटाने मनसे,राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का दिलाय. जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित नंदनवन या शासकीय निवास्थानी प्रवेश केला.

याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे वरळीमधील माजी नगरसेविका रत्ना महाले आणि त्यांच्या सहकारी यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला. आज दोन प्रवेश झाले आहेत वरळी आणि पालघरमधून अनेकजणांनी प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार काम करत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते प्रवेश करत आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रम सर्वात लोकप्रिय आहे २ कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील विकास ठाण्यासारखा झाला, पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. आम्ही बंड केला त्यादिवशी आमदार श्रीनिवास यांच्या मुलाचा वाढदिवस होता, पण त्यांनी त्यावेळी म्हटले आधी लग्न कोंढण्याचे आणि नंतर बाकीचे असं म्हटलं.

राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशाने मार्गदर्शनाने मनसे, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट यांनी त्यांच्या विचाराने प्रवेश केला आहे. पालघर लोकसभेची सीट शिवसेनेची आहे. शिवसेनेची सीट शिवसेनेकडे राहिली पाहिजे असं आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो आहे, असं आदिवासी नेते जगदीश धोडी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT