Husband kills wife for not cooking in nashik  Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! स्वयंपाक येत नाही म्हणून पतीकडून पत्नीची हत्या

स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : लग्न म्हणजे एक पवित्र बंधन आहे. पती-पत्नींनी एकत्र गुण्यागोविंदानं नांदावं, असे अनेक नातेवाईक लग्नात येऊन आशीर्वाद देत असतात. मात्र, सध्या जोडप्यांमधील घरगुती वाद वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच नाशिकमध्ये घरगुती वादाचा भीषण प्रकार समोर आला आहे. स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने नाशिकमध्ये (Nashik) एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हत्येचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर हत्येप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या औरंगाबाद रोड येथील माडसांगवी या विभागात विशाल कापसे व त्याची पत्नी आरतीही सोबत राहायची. त्या दोघांचे लग्न २०१६ साली झालं होतं. विशाल आणि आरतीला ३ मुलं आहेत. लग्न झाल्यापासून दोघांचे आपापसात नेहमी वाद व्हायचे. अनेक क्षुल्लक कारणांवरून दोघे एकमेकांशी भांडायचे. काल रात्री या दोघांचे वाद विकोपाला गेले. पती विशाल कापसेनं आरतीला स्वयंपाक येत नाही, यावरून वाद घालायला सुरुवात केली. या वादात विशालनं आरतीच्या डोक्यात दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण एवढी जबर होती की, त्यातच पत्नी आरतीचा मृत्यू झाला. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सदर हत्येप्रकरणी पती विशाल, त्याचा भाऊ, काका आणि काकीसह ५ लोकांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विशालला ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस करत आहे.

बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून तरुणाची आत्महत्या

दरम्यान, पत्नीवर नाराज असलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरामध्ये घडली आहे. पत्नी मनासरखी मिळली नाही. तसेच, तिच्या सवयीसुद्धा आपल्याला पटत नाही. तिला साधी साडीही नीट नेसता येत नाही. 'आय क्विट', असे म्हणत या पतीने आत्महत्या केली आहे. अजय साबळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. २५ वर्षीय अजयच्या आत्महत्येनंतर परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT