Husband Killed Wife Saam Tv
महाराष्ट्र

Husband Killed Wife: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात पाटा घातला, जागीच मृत्यू, आरोपी पतीला अटक

चारित्र्याच्या संशयावरुन पती शेख खलील याने पत्नीच्या डोक्यात मोठा दगडी पाटा घातला.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद (Aurangabad) शहरातील बाजीपुरा भागात घडलीये. या प्रकरणी आरोपी पती शेख खलील याला जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे (Husband Killed Wife From The Suspicion Of Love Affair).

नेमकं प्रकरण काय?

चारित्र्याच्या संशयावरुन पती शेख खलील याने पत्नीच्या (Wife) डोक्यात मोठा दगडी पाटा घातला. त्यात तिचा जागीच मृत्यू (Death) झाला. भाड्याने घेतलेले घर रिकामे करण्याच्या कारणावरुन या दोघांमध्ये वाद सुरु होता. अंजुम खलील शेख असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी शेख खलील शेख इस्माईल हा खाजगी बसवर ड्रायव्हर म्हणून काम करतो.

2009 मध्ये शेख खलील आणि अंजुम यांचा विवाह झाला होता. त्यांना नऊ आणि सात वर्षांची दोन मुले आहेत. मात्र, तो खलील पत्नीला सतत चारित्र्याच्या संशयावरुन शिवीगाळ आणि मारहाण करत होता. त्यामुळे सतत त्यांच्यात वाद व्हायचे.

खलीलचे हे दुसरे लग्न होते. त्यापूर्वी त्याने वैजापूर येथे एका महिलेशी लग्न करुन तिथेही घर थाठले होते. यावरुन या पती-पत्नीमध्ये (Husband Wife) सातत्याने वाद सुरु होते. याच वादातून खलीलने अंजुमच्या डोक्यात मोठा दगडी पाटा घातला आणि तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरुये.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुरंदर विमानतळाला बाधित शेतकऱ्यांचा विरोध कायम

Ration Card KYC: कामाची बातमी! रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख काय?

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर अन् अशोक सराफ पुन्हा एकत्र, सेटवरचा फोटो समोर

Shocking: लघवी पाजली, नाकाला बूट लावत मानेवर पाय; गैरफायदा घेत भोंदूबाबाचे अमानुष कृत्य, VIDEO व्हायरल

Weather Update : राज्यात पावसाचा ब्रेक! पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज | VIDEO

SCROLL FOR NEXT