Mahad Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News : मित्राच्या आजारपणाचा फायदा घेत पत्नीवर केला बलात्कार; महाड तालुक्यातील संतापजनक घटना

कोथेरी येथे एका ३५ वर्षीय महिलेवर पतीच्या मित्रानेच बलात्कार केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mahad Crime News : राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला अत्याचाराविरोधात कडक पाऊले उचलले जावे, अशी मागणी सामाजिक स्तरातून केली जात आहे. अशातच महाड तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कोथेरी येथे एका ३५ वर्षीय महिलेवर पतीच्या मित्रानेच बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून महाड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

काशिनाथ कृष्णा पवार, आशा काशिनाथ पवार आणि अभी काशिनाथ पवार, अशी गुन्हा  (Crime News) दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपी हे मुंबईच्या चेंबूर परिसरातील रहिवाशी आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी काशिनाथ पवार हा तिच्याच पतीचा मित्र आहे. पीडितेचा पती आजारी असल्याने तो आपल्या पत्नीसह पीडितेच्या घरी आला होता.

यावेळी तुझ्या पतीवर देवदेवस्की केल्याचे सांगून आरोपी काशिनाथ आणि त्याच्या पत्नीने पीडित महिला आणि तिच्या पतीच्या अंगावरून तांदुळ उतरवले. त्यानंतर सोबत कागदाच्या पुडीतून आणलेले पावडर त्याने पीडित महिला आणि तिच्या पतीला पाण्यात मिसळून दिले.

दरम्यान, पावडरचे पाणी पिताच फिर्यादी महिला आणि तिचा पती बेशुद्ध झाले. यानंतर आरोपी काशिनाथ याने फिर्यादी महिलेवर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तब्बल सहा महिने पीडितेवर बलात्कार केला.

इतकंच नाही, तर आरोपीने पीडितेला धमकावत तिच्याकडून तब्बल १२ लाख रुपये देखील उकळले. आरोपी काशिनाथ याचे कृत्य दिवसेंदिवस वाढतच असल्याने अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून महाड शहर पोलिसांनी आरोपी काशिनाथ पवार त्याची पत्नी आशा पवार आणि मुलगा अभी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT