Women Dance Viral Video
Women Dance Viral Video Saam TV

VIDEO : लग्न समारंभात डान्स करताना महिलेला आला हार्ट अटॅक; खाली कोसळताच झाला मृत्यू

लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात डान्स करताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे. प्राथामिक माहितीनुसार, या ह्रदयविकाराच्या झटक्याने या महिलेचा मृत्यू झाला.
Published on

Women Dance Viral Video : उत्तराखंडमध्ये मुलीच्या लग्नात नाचत असताना वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, मध्यप्रदेशातही अशाच प्रकारची एक दुर्देवी घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात डान्स करताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे. प्राथामिक माहितीनुसार, या ह्रदयविकाराच्या झटक्याने या महिलेचा मृत्यू झाला. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  (Latest Marathi News)

Women Dance Viral Video
VIDEO : गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात तुफान राडा; शेकडो प्रेक्षक स्टेजवर चढले अन्...

व्हिडीओत काय आहे?

प्राप्त माहितीनुसार, मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात नुकतंच एका जोडप्याचं लग्न पार पडलं. या लग्नानंतर तिथं सांस्कृतीक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात नवरदेवाकडील चार महिला स्टेजवर डान्स करत होत्या. यातील एक महिला डान्स करताना अचानक स्टेजवर कोसळली.

महिला कोसळताच, इतर महिलांनी तिच्याकडे धाव घेतली. या महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Dance Video) व्हायरल होत आहे. लग्न समारंभात नाचताना या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलीच्या लग्नात नाचताना वडिलांचा मृत्यू

उत्तराखंडमधील अल्मोडा येथे एक दुर्देवी घटना घडली. आपल्याच मुलीच्या लग्नात नाचत असताना एका पित्याचा दुर्देवी मृत्यू झाला. हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना, नवरीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यामुळे लग्नाचा आनंद काही क्षणातच दुःखात बदलला. दुसरीकडे वधूच्या नातेवाईकांनी हल्दवणी येथे जाऊन शोकाकूल वातावरणात विवाह पार पाडला. यावेळी वधूच्या मामाकडून कन्यादान करण्यात आले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com